कोकण रेल्वे हाउसफुल्लच्या मार्गावर, मे महिन्यासाठी प्रतीक्षा यादी, ‘तेजस’लाही चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:36 PM2018-01-20T23:36:41+5:302018-01-20T23:37:06+5:30

कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल, तर जरा लवकर. कारण पुढील ३ ते ४ दिवसांतच मे महिन्यातील आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतीक्षा यादी लागली आहे.

On the route of Konkan Railway HouseFull, May Waiting List for May, 'Tejas' also responded well | कोकण रेल्वे हाउसफुल्लच्या मार्गावर, मे महिन्यासाठी प्रतीक्षा यादी, ‘तेजस’लाही चांगला प्रतिसाद

कोकण रेल्वे हाउसफुल्लच्या मार्गावर, मे महिन्यासाठी प्रतीक्षा यादी, ‘तेजस’लाही चांगला प्रतिसाद

Next

- विहार तेंडुलकर

रत्नागिरी : कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल, तर जरा लवकर. कारण पुढील ३ ते ४ दिवसांतच मे महिन्यातील आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतीक्षा यादी लागली आहे.
मे महिन्यात शाळा, महाविद्यालयांची सुट्टी सुरू होत असल्याने, कोकणात जाणाºया गाड्या या वेळी फुल्ल असतात. शिवाय रेल्वेने ४ महिने अगोदर आरक्षणची सुविधा उपलब्ध केल्याने अनेकांनी पूर्वनियोजन केले आहे.

या रेल्वेगाड्या फुल्ल
- मांडवी एक्स्प्रेस फुल्ल आहे. तिची प्रतीक्षा यादी ८ ते १५ या दरम्यान आहे.
- तुतारी एक्स्प्रेसही १५, १९ आणि २० मे या दरम्यान फुल्ल आहे.
- कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ८ ते १० सीटच सध्या उपलब्ध आहेत. त्याही पुढील पाच दिवसांत फुल्ल होण्याची शक्यता आहे.

- मे महिन्यातील शनिवार, रविवार वा अन्य शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी, तर आतापासूनच रेल्वे आरक्षण फुल्ल आहे.
- केवळ ठरावीक गाड्यांचीच १५ ते २० या दरम्यान आरक्षण सीट उपलब्ध आहेत. पुढील ४ ते ५ दिवसांत त्याही फुल्ल होण्याची शक्यता आहे.

तेजसलाही प्रतिसाद
तेजस एक्स्प्रेसला एरव्ही महागड्या भाड्यामुळे कमी प्रतिसाद मिळतो. मात्र, तेजसही फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मागील पाच दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरक्षणे झाली की, आता केवळ या एक्स्प्रेसचे ५४ ते ७२ सीट्स उपलब्ध आहेत.

Web Title: On the route of Konkan Railway HouseFull, May Waiting List for May, 'Tejas' also responded well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.