ठळक मुद्देलोणावळा आणि मंकी हिल दरम्यान रेल्वे रूळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतल्याने गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस सिंहगड एक्स्प्रेस,डेक्कन एक्स्प्रेस, पुणे -कर्जत पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.गेल्या आठवड्यात मंकी हिल ते खंडाळा दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने जवळपास २ दिवस रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

पुणे, दि. 14- लोणावळा आणि मंकी हिल दरम्यान रेल्वे रूळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतल्याने गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस सिंहगड एक्स्प्रेस,डेक्कन एक्स्प्रेस, पुणे -कर्जत पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात मंकी हिल ते खंडाळा दरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने जवळपास २ दिवस रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.  १४ व १५ सप्टेंबर रोजी देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईहून सुटणारी डेक्कन  एक्स्प्रेस व एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे -कर्जत -पुणे ही पॅसेजर दोन दिवस रद्द केली आहे़ 

शुक्रवारी सकाळी पुण्याहून सुटणारी सिंहगड एक्सप्रेस रद्द केली आहे. तसंच भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दौंड, मनमाडमार्गे वळविण्यात आली आहे. खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ 7 सप्टेंबर रोजी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरले होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.