परदेश दौरे संपल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 02:54 PM2019-06-10T14:54:52+5:302019-06-10T15:37:51+5:30

शिवसेनला अजूनही कळेना, आपण विरोधीपक्षात आहे की सत्ताधारी पक्षात. असा टोमणा अजित पवार यांनी शिवसेनेला लगावला.

 Remembrance of Shivsena farmers after foreign tour | परदेश दौरे संपल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण : अजित पवार

परदेश दौरे संपल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण : अजित पवार

Next

मुंबई - विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.

सत्तेत असून शिवसेना म्हणते की, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर, आम्ही बघून घेईन. शिवसेनला अजूनही कळेना, आपण विरोधीपक्षात आहे की सत्ताधारी पक्षात. असा टोमणा अजित पवार यांनी शिवसेनेला लगावला. परदेशी दौरे पूर्ण झाली आहे शिवसेनेचे, दौरे पूर्ण झाल्यांनतर आता त्यांना दुष्काळाची आठवण येत आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी सेनेला लगावला.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत परिस्थिती रहणार नाही. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायचे आहे. त्यासाठी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही पवार म्हणाले. जनतेने आम्हाला १५ वर्षे संधी दिली होती,त्यामुळे, त्या जनतेसाठी जे-जे करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे पवार म्हणाले.

राम मंदिराच्या मुद्यावरूनही अजित पवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला. भावनिक मुद्दे हाती घेऊन सेना मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. शिवसेना राम मंदिराचा विषय पुढे करून फक्त राजकरण करत असल्याचे अजित पवार म्हणाले.


 


 

Web Title:  Remembrance of Shivsena farmers after foreign tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.