सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:34 AM2018-04-22T00:34:38+5:302018-04-22T00:34:38+5:30

सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे

 The relation of the blood of Sangli is the achievement of the cross border district movement of Maharashtra | सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश

सांगलीच्या रक्ताची नाती महाराष्ट्राच्या सीमापार-जिल्ह्याच्या चळवळीचे यश

Next
ठळक मुद्देराजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्येही विस्तार वाढला...

अविनाश कोळी ।
सांगली : ‘बॉम्बे ओ’या दुर्मिळ रक्तदात्यांच्या चळवळीचा सांगली जिल्ह्यातील छोटासा झरा आता अनेक राज्यांच्या सीमा ओलांडत सागराचे व्यापक स्वरुप सिद्ध करीत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये रक्तदात्यांचा सोशल मीडिया ग्रुप स्थापन करून त्यांना मदत पुरविली जात आहे. रक्ताच्या नात्यांचे हे जाळे आता देशभर पसरविण्याचे काम गतीने पुढे जात आहे.
तासगावमधील विक्रम यादव यांनी गरिबीला तोंड देत या सामाजिक चळवळीला जन्म दिला. अनेक दु:खद प्रसंगातून बोध घेताना त्यांनी या चळवळीला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षातील त्यांची ही धडपड आता देशव्यापी बनू पाहत आहे. बॉम्बे ओ रक्तगट हा दुर्मिळातील दुर्मिळ रक्तगट मानला जातो. अशा दुर्मिळ रक्तदात्यांना व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एकत्र केले. दुसरीकडे त्यांना पाठबळ देणाऱ्या अन्य रक्तदात्यांनाही सोबत घेतले. संपूर्ण महाराष्टÑात त्यांनी १५ हजार ७३0 धडपड्या रक्तदात्यांची एकत्रित बांधणी केली. राज्यासह दिल्ली, हरियाणा व अन्य राज्यात ज्याठिकाणी या दुर्मिळ रक्ताची गरज भासेल, त्याठिकाणी ते रक्त विनामूल्य पोहोचविण्याचे काम विक्रम यादव व त्यांची टीम करीत आहे.
सांगली जिल्ह्यात रुजलेल्या चळवळीने अनेकांना जीवदान दिले. गरोदर मातांपासून लहान मुलांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांना कोणत्याही वेळी रक्त पुरविण्याची व्यवस्था त्यांनी केली. आपल्या राज्यापुरताच आपण विचार न करता, अन्य राज्यातील देशबांधवांचाही विचार केला पाहिजे, असा विचार यादव यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून अन्य राज्यात रक्तदात्यांच्या चळवळीची बांधणी सुरू केली.
आता राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. भविष्यात देशभरातील अन्य राज्यांमध्ये या चळवळीच्या विस्ताराचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.


असे पुरविले जाते रक्त...
एखाद्या राज्यातील रुग्णास बॉम्बे ओ किंवा अन्य कोणत्या रक्ताची गरज असेल, तर मुंबईतील थिंक फौंडेशनकडे जिल्ह्यातील किंवा महाराष्टÑातील रक्तदाता रक्तदान करतो. त्यानंतर विमानाने ते रक्त संबंधित राज्याच्या राजधानीत किंवा जवळच्या शहरात पोहोचविले जाते. तिथून त्याठिकाणचा कार्यकर्ता गरजेच्या ठिकाणी रक्त पोहोचवतो. यासाठीचा खर्च भागविण्यासाठी राज्यातील १५ हजार ७३0 रक्तदाते प्रत्येकी दहा रुपयांप्रमाणे निधी गोळा करतात. त्यातून विनामूल्य हे रक्त रुग्णापर्यंत पोहोचविले जाते.

असे आहेत परराज्यातील ग्रुप

हिमाचल प्रदेशात ५00 दात्यांचा गट असून त्याठिकाणी ‘बॉम्बे ओ’चा दाता नाही.
मध्य प्रदेशात ८00 रक्तदात्यांचा गट असून त्यामध्ये ‘बॉम्बे ओ’ या गटातील एकच रक्तदाता आहे. या गटाशी यादव यांचा दैनंदिन संपर्क आहे.

राजस्थानमध्ये ३ हजार रक्तदात्यांचा गट असून त्यामध्ये दोघेजण ‘बॉम्बे ओ’ या रक्तगटाचे आहेत.

यापूर्वी कोलंबिया आणि मलेशियामधील रुग्णांना या ग्रुपने बॉम्बे ओ या रक्ताचा पुरवठा केला आहे. राज्य व देशाच्या सीमा ओलांडत रक्ताची नाती तयार करणाºया या गटाने त्यांचा कार्यविस्तार वेगाने वाढविण्यास सुरुवात केला आहे.

Web Title:  The relation of the blood of Sangli is the achievement of the cross border district movement of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.