खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:05 AM2019-06-16T04:05:09+5:302019-06-16T04:05:32+5:30

देशभरातील उद्योगांनी मागितली तीन वर्षांची मुदत

Reduce sugar, salt, fat content through foods | खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

खाद्य पदार्थांतून साखर, मीठ, चरबीयुक्त घटक कमी करणार

googlenewsNext

- राजेश मडावी

चंद्रपूर : खाद्य पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीयुक्त घटकांचा अधिक समावेश असल्याने नागरिकांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ३० टक्के मृत्यू केवळ चुकीच्या आहारामुळे होत असल्याचे निष्कर्ष काढल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘इट राइट मुव्हमेंट’ सुरू केली आहे. या मोहिमेच्या बडग्यामुळे खाद्य पदार्थांतून साखर, मीठ व चरबीयुक्त घटक कमी करून आहाराचा ‘नवीन फार्म्युला’ तीन वर्षांच्या आत तयार करू, अशी मुदत २० पेक्षा अधिक मोठ्या उद्योग समूहांनी केेंद्र सरकारकडे मागितली आहे.

खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे मधुमेह, हृदयरोग व उच्च रक्तदाब यासारखे आजार होतात. सॉस, सिरफ, रेडी टू इट- फू ड, मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांमुळे बालकांना विविध आजारांनी घेरले. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने जागृती सुरू
केली आहे.

अशी आहे ‘राइट इट मूव्हमेंट’
मोहिमेचा उद्देश केवळ ‘कमी आणि पौष्टिक खा’ एवढ्यापुरताच नाही. दैनंदिन आहारात साखर, मीठ, मैदा व चरबीयुक्त पदार्थांचा अतिवापर केल्याने होणारे दुष्परिणाम समजून सांगावे. त्याविरोधात देशभरातील अन्न उत्पादक कंपन्यांनी ठोस पाऊल उचलावे. सध्याच्या पदार्थांमधून साखर, मीठ व मैदा वगळावे, यासाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी दिली.

साखरेत कोणतेही व्हिटॅमीन नसते. मैदा म्हणजे एक प्रकारचे पांढरे विष आहे. यात तंतूमय (फ ायबर ) पदार्थ नसतो. तेलाचा अधिक वापर शरीरावर अनिष्ट परिणाम करतो. निरोगी आहारासाठी आज विविध पर्याय उपलब्ध आहेत.
- डॉ. गोपाल मुंदडा, आहारतज्ज्ञ, चंद्रपूर

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेच अनेक आजार वाढत आहेत. त्यामुळे आहारातील हानिकारक अन्नघटक बाजूला काढून नवीन फॉर्म्युला तयार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही. त्यामुळे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘राईट इट मुव्हमेंट’ सुरू केली. त्याद्वारे देशभरात जागृती केली जात आहे.
- पवन अगरवाल, कार्यकारी संचालक, अन्न सुरक्षा व गुणवत्ता प्राधिकरण, दिल्ली.

Web Title: Reduce sugar, salt, fat content through foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.