राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 02:57 PM2018-03-11T14:57:33+5:302018-03-11T14:57:33+5:30

राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राममंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू होईल.

Ram temple will be built on a fixed track - Bhayyaji Joshi | राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी

राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी

Next

नागपूर : राममंदिर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर राममंदिर उभारणीसाठी प्रक्रिया सुरू होईल. या मुद्द्यावर सर्व समाजांचे एकमत होणे कठीण बाब आहे. यासाठी होणा-या प्रयत्नांचे स्वागतच आहे. परंतु राममंदिर मात्र निर्धारित जागेवरच बनणार. तेथे इतर काहीच बनू शकत नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. सरकार्यवाहपदी चौथ्यांदा निवड झाल्यानंतर त्यांनी रविवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून संघाची महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडली.

आपल्या देशात शेतक-यांची अवस्था लक्षात घेता शासनाने या मुद्द्याकडे गंभीरतेने पाहण्याची आवश्यकता आहे. शासनाने शेतक-यांप्रती संवेदनशील व्हायला हवे. प्रश्नांना समजून त्यावर तोडगा काढायला हवा. प्रसंगी धोरण बदलविले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतक-यांना आवश्यक ते उत्पादन मूल्य मिळाले पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे. सोबतच शेतक-यांनादेखील मानसिकता बदलावी लागेल, असेदेखील भय्याजी जोशी म्हणाले. यावेळी संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार ठाकूर उपस्थित होते. 

निवडणूकांत केंद्र सरकारला जनता देईल पाठिंबा-
भाजपला देशभरात मिळत असलेले यश हे त्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. कुणामुळे कोणी समोर आला असे होत नाही. संघामुळे भाजप विजयी होत आहे असे नाही. समाजातील अनुकूल वातावरणामुळे भाजपला सत्ता मिळाली. देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे २०१९ मधील निवडणूकांत केंद्र सरकारला जनता निश्चित पाठिंबा देईल, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी व्यक्त केला.

Web Title: Ram temple will be built on a fixed track - Bhayyaji Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.