Raj Thackeray should keep away from the dustbin of Delhiis | दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे
दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे

मुंबई : इंधनाच्या उच्चांकी दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या आंदोलनात मनसेही सहभागी होणार आहे. बंदला केवळ पाठिंबाच नव्हे; तर सक्रिय सहभाग राहणार असल्याचे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीश्वरांनी काय काय चुका करून ठेवल्यात, याचा हिशोब त्यांच्या कानठळी नीटपणे पोहोचेल इतका कडकडीत बंद पाळा, असे आवाहन करीत मोदी सरकार व भाजपावर प्रहार केला आहे. नोटाबंदीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आल्याने ती सावरण्यासाठी भरमसाट कर लादण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी- विरोधात कॉँग्रेसने केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात १० सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला असून, डाव्या पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. मनसेनेही त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी त्यासंबंधी आपली भूमिका जाहीर केली आहे.
>‘नासधूस करू नका’
सार्वजनिक मालमत्तेची नासधूस व सामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना राज यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. गणपतीचे आगमन असल्याने नागरिकांनी सायंकाळी पाच वाजल्यानंतर खरेदीसाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.


Web Title: Raj Thackeray should keep away from the dustbin of Delhiis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.