सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास 

By ऑनलाइन लोकमत on Fri, February 09, 2018 8:37pm

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत.

मुंबई - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केल्याने पटेलांवर अन्याय झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्यावर घणाघाती टीका करणाऱ्या मोदींना राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या नव्या व्यंगचित्रामधून इतिहास पढवला आहे.   राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये महात्मा गांधी,  जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रकट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी महात्मा गांधी भारताचा इतिहास नावाचे पुस्तक हातात घेऊन आपल्यासमोर बसलेल्या मोदी आणि अमित शहा यांना इतिहास पढवत असून, नेहरू यांना काँग्रेसने नव्हे तर आपणच पंतप्रधान केल्याचे सांगत असल्याचे सांगत आहेत. तसेच नेहरू हे गृहमंत्री असते तरी ते काँग्रेसचे नेते असल्याचे ठणकावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. गांधीजींचे हे वक्तव्य ऐकल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे पाहण्यासारखे झाल्याचे दिसत आहे.  भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता, दरम्यान, हा विषय घेऊन राज ठाकरेंनी मोदींवर टीका केल्याने पुढच्या काही दिवसांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

संबंधित

मंत्रालयाचे 'आत्महत्यालय' झाले, हाच भाजपाच्या काळातील बदल- राज ठाकरे
न्या. लोया मृत्यू प्रकरणावरच्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे अमित शाहांना फटकारे
राज यांच्या व्यंगचित्रात अवतरले शिवराय; म्हणाले, 'जातीपातीच्या चिखलातून बाहेर या!'

महाराष्ट्र कडून आणखी

शेतकऱ्याचा मित्र संकटात; भ्रामक समजुती मांडूळ सापाच्या जिवावर
‘लोकमत’च्या दणक्याने सामाजिक ‘अ’न्याय दूर, राज्यातील मागास विद्यार्थ्यांना दिलासा  
राज्यातील ५१ पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदके जाहीर, मुंबईचे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचा समावेश
अ‍ॅट्रोसिटीच्या खटल्यातून नारायण राणे यांना तात्पुरता दिलासा
फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार संधी - विनोद तावडे

आणखी वाचा