Raj Thackeray attack on Narendra Modi | वर्मा प्रकरण गाडता गाडता मोदीच पडलेत खड्ड्यात! राज ठाकरेंचे व्यंगबाण
वर्मा प्रकरण गाडता गाडता मोदीच पडलेत खड्ड्यात! राज ठाकरेंचे व्यंगबाण

ठळक मुद्देआलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केलेसीबीआयमधील आलोक वर्मा प्रकरण गाडून टाकता टाकता नरेंद्र मोदी खोदलेल्या खड्ड्यात पडले आहेत, असे राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले

मुंबई - आलोक वर्मा प्रकरणावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. सीबीआयमधील आलोक वर्मा प्रकरण गाडून टाकता टाकता नरेंद्र मोदी खोदलेल्या खड्ड्यात पडले आहेत, असे राज ठाकरे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे. तसेच आज सरकारच्या दबावामुळे नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्यात आले आहे, हे असेच सुरू राहिले तर उद्या गायन वादनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंधने येतील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
 
 राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करताना आज एका व्यंगचित्रामध्ये देशातील परिस्थितीची दोन चित्रे रेखाटली आहेत. त्यातील पहिल्या चित्राला  हुद्दा घालवला आणि खड्डा कमावला असे शीर्षक देऊन राज ठाकरे यांनी आलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. तर राग आणीबाणी या शीर्षकाखाली रेखाटलेल्या व्यंगचित्राच्या दुसऱ्या भागात काही दिवसांनी हे सरकार गायन वादनासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंधने आणेल अशी भीती व्यक्त केली आहे. 


Web Title: Raj Thackeray attack on Narendra Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.