विदर्भ, मराठवाड्याला पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:08 AM2018-09-21T06:08:59+5:302018-09-21T06:09:08+5:30

पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा दुष्काळी झळा बसण्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Rainy signal to Vidarbha, Marathwada | विदर्भ, मराठवाड्याला पावसाचा इशारा

विदर्भ, मराठवाड्याला पावसाचा इशारा

Next

मुंबई : पावसाने पाठ फिरवल्याने पुन्हा एकदा दुष्काळी झळा बसण्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात त्याचे आगमन होण्याचे शक्यता आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी २१ आणि २२ सप्टेंबर रोजी जोरदास पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. यामुळे काही गावांचा संपर्कदेखील तुटू शकतो. म्हणूनच नदी-नाल्यांच्या काठी राहणाºया लोकांनी सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोकणात देखील या दरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील. परंतु दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण-मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. शेतकºयांनी हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
>कोकणात रिमझिम
विदर्भ, मराठवाड्यात बºयाच ठिकाणी २१ व २२ सप्टेंबरला जोरदार पाऊस पडेल. तर, या दरम्यान कोकणात रिमझिम पावसाची शक्यता आहे.

Web Title: Rainy signal to Vidarbha, Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.