अवकाळीचे सावट : विदर्भात शनिवारी गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 10:10 PM2018-02-08T22:10:11+5:302018-02-08T22:10:26+5:30

कोकण व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शनिवार, रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़

Rainfall in Vidarbha on Saturday, rain in central Maharashtra and Marathwada too | अवकाळीचे सावट : विदर्भात शनिवारी गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस

अवकाळीचे सावट : विदर्भात शनिवारी गारपिटीची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस

Next

पुणे : कोकण व परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शनिवार, रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १२ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ 

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील जवळपास सर्व ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़ 

१० फेब्रुवारीला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस  पडण्याची शक्यता आहे़ ११ फेबु्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १२ फेब्रुवारीला विदर्भात बºयाच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ 
 

११ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता़

१२ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदभाृत तुरळक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता़ 

Web Title: Rainfall in Vidarbha on Saturday, rain in central Maharashtra and Marathwada too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.