सलग दुसऱ्या दिवशी मुंबई- पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 01:51 PM2019-07-02T13:51:04+5:302019-07-02T14:22:25+5:30

मंगळवारी मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.

Railway traffic disrupted for the second day between Mumbai and Pune | सलग दुसऱ्या दिवशी मुंबई- पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत 

सलग दुसऱ्या दिवशी मुंबई- पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत 

Next
ठळक मुद्देप्रगती, इंद्रायणी व डेक्कन एक्सप्रेस या गाड्याही रद्दअचानक दुप्पट गर्दी वाढल्याने एसटी प्रशासनाची उडाली तारांबळ

पुणे - सलग दिवशी पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक विस्कलित झाली. मंगळवारी मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी व सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत व लोणावळा दरम्यान सोमवारी पहाटे रुळावरून मालगाडी घसरल्याने पुणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती. त्यामुळे डेक्कन क्वीन, प्रगती यासह सकाळी पुण्यातून मुंबईकडे धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. परिणामी, पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची ससेहोलपट झाली. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांनी एसटी बसकडे मोर्चा वळविला. पण अचानक दुप्पट गर्दी वाढल्याने एसटी प्रशासनाची तारांबळ उडाली. तर मंगळवारी मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे सेवेवर परिणाम झाला. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवासी हतबल झाले. त्यामुले आजही एसटी बसला गर्दी होती. एसटी प्रशासनाकडून जादा गाड्या सोडन्यात येत आहेत.तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लांबपल्याच्या काही गाड्या पुण्यातपर्यंत  धावत आहेत. या गाड्या पुण्याहून परतत आहेत.प्रगती, इंद्रायणी व डेक्कन एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: Railway traffic disrupted for the second day between Mumbai and Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.