मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:40 PM2019-06-12T19:40:39+5:302019-06-12T19:41:00+5:30

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी.

Radhakrishna Vikhe attack on Congress leader's | मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

googlenewsNext

अहमदनगर - काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी. काँग्रेस पक्षात आता चिंतन करण्याचा सुध्दा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावरही विखे यांनी टीका केली. 

 निळवंडे कालव्यांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पक्षविरहीत संघर्ष केला. त्याचे हे यश आहे. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनी जिरायती भागातील पाणी प्रश्नांबाबत मांडलेली भूमिका प्रत्यक्षात उतरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने बोलावलेल्या बैठकीत झालेले निर्णय महत्वपूर्ण आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केलेले सहकार्य आणि ज्येष्ठ नेते माजीमंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश आहे, असेही विखे म्हणाले.

भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी
लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी? याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही राधाकृष्ण विखे म्हणाले.

Web Title: Radhakrishna Vikhe attack on Congress leader's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.