देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:55 PM2018-10-23T13:55:04+5:302018-10-23T13:57:17+5:30

देशात ९०३ विद्यापीठे व ३३ हजार ९०५ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचा अभाव आढळून येतो आहे.

quality of country university make a build up is necessary : President of India Ramnath Kovind | देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशातील विद्यापीठानी गुणवत्तेमध्ये सुधारणा करावी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ठळक मुद्देसिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ पदवी प्रदान समारंभ

पुणे : देशात ९०३ विद्यापीठे व ३३ हजार ९०५ महाविद्यालये आहेत. मात्र अनेक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचा अभाव आढळून येतो आहे. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयांनी गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयन्त करावेत असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये ते बोलत होते.यावेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते. यावेळी शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. 
कोविंद म्हणाले, पुण्याला मोठी शैक्षणिक परंपरा आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांनी शैक्षणिक संस्था सुरू केल्या असे गौरवोद्गार कोविंद यांनी काढले.

Web Title: quality of country university make a build up is necessary : President of India Ramnath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.