‘समृद्धी’विरोधी आंदोलनाच्या नेत्याकडूनच जमिनीची खरेदी, अल्प मोबदला दिल्याचा ठपका

By यदू जोशी on Sat, November 11, 2017 6:41am

समृद्धी महामार्गाच्या विरोधात आंदोलन करीत असलेले बबन हरणे यांनी या महामार्गाच्या परिसरात जमिनींची खरेदी केल्याचे समोर आले आहे.

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या विरोधात आंदोलन करीत असलेले बबन हरणे यांनी या महामार्गाच्या परिसरात जमिनींची खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्याने धाकदपटशा केल्याची तक्रार ठाणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली असून ही शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक खाते या संदर्भात चौकशी करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास विरोध दर्शवित तेथील शेतकºयांचे नेतृत्व करीत असलेले बबन हरणे यांनी या भागात जमिनी खरेदी केली आहे. काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हरणे यांच्या आरोपांचे दाखले देत सरकारला वारंवार टीकेचे लक्ष्य केले आहे. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेकडे झालेल्या तक्रारीत शहापूर तहसिल कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाºयांनीही हरणेंच्या नावाखाली जमिनी खरेदी केल्याचे म्हटले आहे. जमिनीची बाजारभावाने किंमत अधिक असतानाही अल्प मोबदला देऊन जमिनी खरेदी केल्याचेही प्रकार घडले असून त्यामुळे एकूणच गूढ वाढले आहे. ‘तुमच्या जमिनी सरकार जमा करून घेईल व तुम्हाला काहीही मिळणार नाही’, असे धमकावून हरणे यांना जमिनी विकण्यास काही अधिकाºयांनी शेतकºयांना भाग पाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. खराडे, हेदवली, आसनगावमध्ये घेतलेल्या जमिनींचा उल्लेख करण्यात आला आहे. अरुणसिंग या नागरिकाने ही तक्रार गुन्हे शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही केली आहे. त्यात बबन हरणे यांनी साईसंसार इमारतीत घेतलेल्या दोन फ्लॅटचाही उल्लेख आहे. या आरोपांबाबत हरणे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो स्विच्ड् आॅफ होता.

संबंधित

२२६७ विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास
४६ युनिटचे बिल ९५,२४० रुपये
वित्त अधिकारी-झेडपी अध्यक्षांमध्ये वाद पेटला
जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल : उच्चायुक्त ए.एम.गोंडाणे
नागपुरात विधवा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र कडून आणखी

२२६७ विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास
४६ युनिटचे बिल ९५,२४० रुपये
वित्त अधिकारी-झेडपी अध्यक्षांमध्ये वाद पेटला
जागतिक पातळीवर भारताचे भविष्य उज्ज्वल : उच्चायुक्त ए.एम.गोंडाणे
नागपुरात विधवा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न

आणखी वाचा