पुण्याच्या ३० वर्षीय तरुणाचे हृदयदान! ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 1:06am

पुण्यातील ३० वर्षीय तरुणाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्याच्या पत्नीने हृदयदान करण्याचा निर्णय घेतल्याने, मुंबईच्या ४२ वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतील ही ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुलुंड येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी यशस्वीपणे पार पडली.

मुंबई : पुण्यातील ३० वर्षीय तरुणाला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्याच्या पत्नीने हृदयदान करण्याचा निर्णय घेतल्याने, मुंबईच्या ४२ वर्षीय रुग्णाला नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतील ही ८४वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुलुंड येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी यशस्वीपणे पार पडली. पुण्यातील ३० वर्षांचा तरुण हायपर टेन्शनने घरातच कोसळला. त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याची अवस्था बिकट होती. काही वेळातच त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. या वेळी अवयवदान समुपदेशन पथक, डॉक्टर यांनी त्याच्या पत्नीची भेट घेऊन, हृदय, तसेच अवयवदानाबाबत सांगितले. त्यास तिने होकार दिला. त्यानुसार, त्याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड दान करण्यात आले. चेंबूर येथील ४२ वर्षीय रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यासाठी पुण्याहून पहाटे २.१८ वाजता निघालेले हृदय पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी मुलुुंड येथील रुग्णालयात पोहोचले. मृत नातेवाइकाच्या अवयवदान करण्याच्या निर्णयाची सध्या तरी नितांत गरज आहे, असे ज्येष्ठ हृदयशल्य विशारद डॉ.अन्वय मुळे यांनी सांगितले.

संबंधित

शस्त्रक्रिया विभागात पाण्याचा ठणठणाट
यापुढे मनोरुग्णाच्या संमतीशिवाय मानसोपचारतज्ज्ञांना उपचार करता येणार नाहीत; जुलैपासून नवीन कायदा लागू होणार 
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे!
तुमच्या या वाईट सवयी असतात तुमच्यासाठी फायदेशीर
पुण्यातील रस्त्यांवर कुत्र्यांची दहशत

महाराष्ट्र कडून आणखी

‘सागर’ वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला धोका नाही
संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या १०० जागा लढवणार
बीड जिल्हा परिषदेतील ६ सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती
पाच वर्षे मानधन मगच कायम, राज्य शासनाचा फॉर्म्युला
राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील : देवेंद्र फडणवीस

आणखी वाचा