पुणे हे फक्त ठिकाणाचं नाव थोडंच आहे? पुणे या दोन अक्षरांमध्ये अस्सल जिणं आहे... गाणे अन् खाणंही आहे! इतिहासाचा जाज्वल्य वारसा लाभलेल्या पुण्याला आधुनिक काळातली महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी मान्यता मिळाली आहे.
पुणे या दोन अक्षरांमध्ये पुणेकरांचा प्राण सामावलेला आहे. आणि पुण्याचं अप्रूप असंख्य कारणांमुळे विविध व्यक्तिंना वाटत आलेलं आहे. अशा या बहुरंगी बहुढंगी पुण्याविषयी काय वाटतं तुम्हाला हे आमच्याशी जरूर शेअर करा.  पुण्याविषयीच्या तुमच्या भावना व्यक्त करा 250 शब्दांमध्ये...