५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:01 PM2019-02-15T17:01:24+5:302019-02-15T17:06:26+5:30

पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असणारे नरेंद्र मोदी  त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असत. मी मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही.

'Pulwama attack' is failure of Modi government : Sharad Pawar | ५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली : शरद पवार 

५६ इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकार्यक्षमता सिद्ध झाली : शरद पवार 

पुणे : पूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर त्या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असणारे नरेंद्र मोदी  त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असत. मी मात्र आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही; पण  देशाचे संरक्षण करण्यात केंद्र सरकारचे अपयश यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

                ज्येष्ठ नेते पवार यांनी शुक्रवारी त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी काल पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले. पवार म्हणाले, की ही राजकारण करण्याची वेळ नाही. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्व स्तरांतून निषेध होत आहे. संपूर्ण देश शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. संपूर्ण देश आज शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे. निवडणुकीपूर्वी ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान मोदी हे मनमोहनसिंग यांच्या सरकारवर असे हल्ले झाल्यानंतर, तुम्ही निषेध पत्र पाठवता, अशी टीका करीत सरकारला धारेवर धरायचे. आता, मात्र पुलवामा इथे झालेल्या नरेंद्र मोदींची अकार्यक्षमता सिद्ध झाली. देशाचे संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान  मोदी आणि त्यांच्या सरकारला अपयश आल्याचे हे निदर्शक आहे.

                 या हल्ल्यात शेजारच्या देशाने दहशतवाद्यांना मदत केलीस हे उघडपणे दिसते. दहशतवाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आलेली आहेत, ते प्रशिक्षित होते. याचा अर्थ, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, हे उघड आहे. संपूर्ण माहिती घेऊन पूर्वनियोजित पद्धतीने हा हल्ला घडविण्यात आल्याचे दिसते, असे पवार म्हणाले. 

Web Title: 'Pulwama attack' is failure of Modi government : Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.