Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 08:14 PM2019-02-17T20:14:15+5:302019-02-17T20:18:03+5:30

सीआरपीएफच्या बसमधून ठका बेलकर शेवटच्या क्षणी खाली उतरले

Pulwama Attack crpf jawan thaka belkar survives after his leave confirmed at the last moment | Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला

Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला

googlenewsNext

अहमदनगर: सीआरपीएफमधील सहकाऱ्यांसह काश्मीरकडे निघालेल्या जवान ठका बेलकर यांचा जीव एका मेसेजमुळे वाचला. लग्नासाठी सुट्टी मंजूर झाल्याचा मेसेज आल्यानं ठका अगदी शेवटच्या क्षणी बसमधून खाली उतरले. त्यावेळी बसमधील सहकाऱ्यांनी अगदी आनंदात त्यांना निरोप दिला. पुढे याच बसवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये बेलकर यांच्या सहकाऱ्यांना वीरमरण आलं. तेव्हापासून बेलकर यांच्या डोळ्यासमोरुन सहकाऱ्यांचे चेहरे जात नाहीत. अगदी हसत, आनंदात त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देणाऱ्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी बेलकर यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत आहेत. 

पारनेर तालुक्यातल्या गुरवेवाडीमधील गागरेझाप इथं राहणाऱ्या 28 वर्षीय ठका बेलकर सीआरपीएफच्या ७६ व्या बटालियनमध्ये आहेत. 24 फेब्रुवारीला त्यांचं लग्न आहे. त्यासाठी त्यांनी सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी काश्मीरकडे निघण्याची तयारी केली. बसमध्ये जे जवान होते, त्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक पंधरावा होता. मात्र बस निघण्यापूर्वी त्यांना सुट्टी मंजूर झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे बस निघण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी ते खाली उतरले. 

ठका बेलकर बसमधून उतरताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर बस निघून गेली आणि काही वेळातच तिच्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवल्याची बातमी ठका यांना समजली. आपला जीव थोडक्यात बचावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र आपल्या सहकाऱ्यांना कायमचं गमावलं असल्याच्या मानसिक धक्क्यातून ते अद्यापही सावरलेले नाहीत. निरोप देणाऱ्या सहकाऱ्यांचे चेहरे आठवून ठका बेलकर यांना अश्रू अनावर होत आहेत. 
 

Web Title: Pulwama Attack crpf jawan thaka belkar survives after his leave confirmed at the last moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.