सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद - वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:05 AM2018-03-07T06:05:48+5:302018-03-07T06:05:48+5:30

अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचा-यांना प्रतीक्षा असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सरकारने केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

Provision for the current budget for the Seventh Pay Commission - Finance Minister Mungantiwar's information | सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद - वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती 

सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद - वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती 

Next

 मुंबई -  अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचा-यांना प्रतीक्षा असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सरकारने
केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मात्र, यासंदर्भात नेमलेल्या के.पी. बक्षी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित निर्णय घेतला जाईल, असे सांगून अनिश्चितता कायम ठेवली.
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाºयांना पूर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारने
यापूर्वी अनेकदा घोषणा केली. मात्र, तो कधी लागू करणार, हे जाहीर केलेले नाही. यासंदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास सरकार
बांधील आहे.
अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. परंतु यासंदर्भात नेमलेल्या बक्षी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कर्मचाºयांना
त्यांच्या वेतनश्रेणीबाबत १५ मार्चपर्यंत अभिप्राय नोंदवता येतील. सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाºयांना संपूर्ण सेवाकालावधीत काही अटी व शर्तींच्या अधीन राहून बालसंगोपन रजा देण्याबाबत शासन विचार करत आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

वयोमर्यादेचा निर्णय लवकरच 

सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद सरकारी कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत नेमण्यात आलेल्या खटुआ समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. वयोमर्यादेबाबत दोन मतप्रवाह आहेत. वयोमर्यादा वाढवल्यास रोजगाराच्या संधी हुकतात. त्यामुळे युवकांचा विरोध आहे. तर वयोमर्यादा वाढल्यास कर्मचाºयांच्या अनुभवाचा लाभ मिळू शकतो, असे कर्मचारी संघटनांचे मत आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत कोणतीही समिती शासनाने नेमली नाही, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

संगीत कलाप्रकारांवर
५०० रुपयांची सूट
♦संगीत कलाप्रकारांवर
प्रत्येक तिकिटामागे २५०
रुपयांऐवजी ५०० रुपये
करमाफी केली आहे.
♦१५ जानेवारीपासून हा
निर्णय अमलात आला आहे.

 

Web Title: Provision for the current budget for the Seventh Pay Commission - Finance Minister Mungantiwar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.