विदर्भात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:31 AM2018-12-15T01:31:10+5:302018-12-15T01:31:29+5:30

बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत.

The possibility of rain in Vidarbha | विदर्भात पावसाची शक्यता

विदर्भात पावसाची शक्यता

Next

मुंबई : बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व-विदर्भात (पूर्व-अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्हे) १६ ते १७ डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व-यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुके राहील आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागात १५ ते १७ रोजी काही प्रमाणात आभाळी वातावरण राहील. पूर्व-विदभार्तील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: The possibility of rain in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.