लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॉँग्रेस कार्यकर्त्यांकडून ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला होत असलेला विरोधामुळे, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी २४ तास त्यांच्यासमवेत दोन सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. २८ जुलैला चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरविण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आणीबाणीवर आधारित असलेल्या ‘इंदू सरकार’ या चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व संजय गांधी या दिवंगत नेत्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आक्षेप घेत, कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध केला आहे.