प्लॅस्टिकबंदीनंतर आता रासायनिक खतांवर बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:05 AM2018-06-07T01:05:11+5:302018-06-07T01:05:11+5:30

प्लॅस्टिकबंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सांगितले.

 Plastic ban impedance now! | प्लॅस्टिकबंदीनंतर आता रासायनिक खतांवर बंदी!

प्लॅस्टिकबंदीनंतर आता रासायनिक खतांवर बंदी!

मुंबई : प्लॅस्टिकबंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सांगितले. १०० टक्के प्लॅस्टिकबंदी करून दाखविणाºया स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांनी बक्षिसे जाहीर केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पर्यावरणविषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात कदम बोलत होते. या वेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते. अन्नधान्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेकांना गंभीर आजार जडले आहेत. म्हणून प्लॅस्टिकबंदीनंतर आता रासायनिक खते वापरण्यावरही बंदी आणण्यासाठी पर्यावरण विभाग विचार करीत आहे, असे कदम यांनी या वेळी सांगितले.

ग्रामपंचायतींना १० लाख
१०० टक्के प्लॅस्टिकबंदी करून दाखविणाºया महापालिकेस २५ लाख, नगरपालिकेस १५ लाख, तर ग्रामपंचायतीस १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे कदम यांनी जाहीर केले.

Web Title:  Plastic ban impedance now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी