वनविकासातील लोकसहभाग अमूल्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 05:23 PM2018-03-21T17:23:19+5:302018-03-21T17:23:19+5:30

पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

People in the development of forestry are invaluable - Chief Minister Devendra Fadnavis | वनविकासातील लोकसहभाग अमूल्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वनविकासातील लोकसहभाग अमूल्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई -  पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुमित मल्लिक,  वन विभागाचे सचिव विकास खारगे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेलसिंह चंदेल यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार नेतृत्वाखाली वन विभागाने मागील तीन वर्षात लक्षणीय काम केल्याने महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर ४ क्षेत्रात पहिल्या स्थानावर आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वनेत्तरक्षेत्रात २०१५ ते २०१७ या कालावधीत २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली आहे. पर्यावरण संतुलनाच्या कामात वन विभागाने  महत्वाचा वाटा उचलला आहे. वन वाचतील ती नागरिक आणि समाजाच्या सहभागातून हे वास्तव स्वीकारून वन विभागाने लोकसहभाग मिळवला, स्वंयसेवी संस्था, संघटना, समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र केले आणि या माध्यमातून वन विकासाच्या संकल्पामागे एक मोठी फळी निर्माण केली. हे जंगल, हे वन आपलं आहे ही भावना लोकमनात निर्माण करण्यात वन विभाग यशस्वी ठरला. यासाठी वन विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारी, संयुक्त वन व्यवस्थापन समित्या अभिनंदनास पात्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

संकल्प करणे सोपे परंतू तो अंमलात आणणे कठीण असते असे सांगून ५० कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाची याच लोकसहभागाच्या सुत्रातून पूर्तता होईल असा विश्वास वाटत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, आता वृक्ष लागवड एक लोकचळचळ झाली आहे. वन आणि वन्यजीव संवर्धनातून रोजगार निर्मिती होत आहे.  इको टुरिझम मुळे वनक्षेत्रातील आणि वनालगतच्या गावातील लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.  निसर्गाशी साधर्म्य राखून आपल्या अनेक पिढ्या वर्षानूवर्षे जगल्या. हेच संचित आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. निसर्गाशी आपलं नातं काय आहे हे सांगणाऱ्या संत तुकारामांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” असं सांगत एक बृहत परिवार निर्माण केला. त्यांचा हा शाश्वत विचार आपल्याला समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

जगण्यासाठीच्या आवश्यकतेमध्ये वन विभाग पहिला- सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही राज्यात  वन विभाग प्राधान्यक्रमात शेवटून पाचवा  मानला असला तरी तो संपूर्ण जगात जगण्यासाठीच्या ज्या आवश्यकता आहेत, त्यात मात्र पहिल्या क्रमांकावर आहे असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षाची जोपासणा हीच निसर्गाची उपासना आहे. त्यामुळे या विभागाकडे सरकारी विभाग म्हणून पाहू नये. वृक्ष लावून जगवणे हे एक ईश्वरीय कार्य आहे. पुढच्या पिढीच्या जन्मासाठी पृथ्वीवर वन ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वन हा माणसांना जगवणारा विभाग आहे तसाच तो महसूल मिळवून देणाराही विभाग आहे. महसूल वाढवण्यासाठी उर्जा लागते. ती उर्जा देण्याचे काम वन विभाग करतो. शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि शुद्ध वर्तणूकीस प्रोत्साहन देणाऱ्या आणि “वन से धन तक आणि जंगल से जीवन के मंगलतक” संदेश देणाऱ्या वन विभागाला पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.

Web Title: People in the development of forestry are invaluable - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.