जायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:15 AM2018-10-24T05:15:40+5:302018-10-24T05:16:05+5:30

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून २५४.५० दलघमी, अर्थात ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले.

Order to release 9 TMC water in Jaikwadi | जायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

जायकवाडीत ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

औरंगाबाद/अहमदनगर/नाशिक : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून २५४.५० दलघमी, अर्थात ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. हे आदेश तात्काळ अमलात आणण्याची सूचनाही त्यांनी केली. मात्र, पाणी सोडण्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांचा तीव्र विरोध आहे. नाशिक जिल्ह्यातील काही जणांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. पाणी सोडण्यासाठी नाशिक, नगर जिल्ह्यांतून विरोध होत आहे.
राजकीय दबावापोटी वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भातील आदेश निघण्यास विलंब होत होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ पाणी सोडा, असा आदेश नियमन प्राधिकरणाला द्यावा लागला. या आदेशानंतर महामंडळाने मंगळवारी सकाळीच उर्ध्व गोदावरी खोºयातील धरण समूहातून ९ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश दिले.
दुष्काळ स्थितीत वा जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांहून कमी झाल्यावर नाशिकच्या धरणांतील पाणी जायकवाडीमध्ये सोडावे, असा निर्णय उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिला आहे. त्यानुसार, पाणीसाठा ६५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिकमधील चार धरणांतून ८.९९ टीमसी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
>वरच्या धरणांतून असे सोडणार पाणी
धरणे पाणीसाठा सोडण्यात येणारे पाणी
(टक्केवारी) (दलघमी/टीएमसी)
मुळा ९७.९८ ५४.००/१.९०
प्रवरा १०६.८५ १०९.००/३.८५
गंगापूर १२०.१४ १७.००/०.६०
गोदा-दारणा ११४.१० ५७.५०/२.०४
पालखेड १२०.७७ १७.००/०.६०
एकूण १०९.९७ २५४.५०/८.९९

Web Title: Order to release 9 TMC water in Jaikwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.