डीएसकेंच्या खात्यांत केवळ ४३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:05 AM2018-03-07T04:05:12+5:302018-03-07T04:05:12+5:30

ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यांत केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढी रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे.

 Only 43 crores in DSK accounts | डीएसकेंच्या खात्यांत केवळ ४३ कोटी

डीएसकेंच्या खात्यांत केवळ ४३ कोटी

googlenewsNext

पुणे  - ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यांत केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये एवढी रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे़
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके दाम्पत्याला अटक केली होती़ त्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. डी़ एस़ कुलकर्णी यांची पुणे, मुंबई येथील कार्यालये, घरे यांवर छापे घालून आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्याच वेळी त्यांची विविध बँकांमध्ये असलेली २७५ खाती गोठवली होती़ या बँक खात्यांत मोठी रक्कम शिल्लक असेल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक तक्रारदारांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.
डीएसके यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे़ त्यांनी डीएसके यांच्या बँक खात्यांची तपासणी करून पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट नुकताच सादर केला़ त्यानुसार या सर्व बँक खात्यांत मिळून केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली असल्याचे सहायक पोलीस आयुक्त न्ीालेश मोरे यांनी दिली़

मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू होणार
पोलिसांनी डीएसके यांच्या ७ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत़ याशिवाय त्यांच्या मालमत्तांची यादी करून लिलावाच्या प्रक्रियेसाठी महसूल विभागाकडे पाठविली आहे़ महसूल विभागाने २४६ मालमत्तांचा प्रस्ताव तयार करून त्याची अधिसूचना काढण्यासाठी गृह खात्याकडे सादर केला आहे़ ही अधिसूचना निघाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे़

Web Title:  Only 43 crores in DSK accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.