राज्यातील वृद्ध असुरक्षित, धक्कादायक वास्तव; २१,४१० गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:31 AM2017-12-02T05:31:50+5:302017-12-02T05:32:10+5:30

महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक, हत्या असे

 Old, unsafe, shocking reality in the state; 21,410 cases filed | राज्यातील वृद्ध असुरक्षित, धक्कादायक वास्तव; २१,४१० गुन्हे दाखल

राज्यातील वृद्ध असुरक्षित, धक्कादायक वास्तव; २१,४१० गुन्हे दाखल

Next

मुंबई : महाराष्ट्रात वृद्ध नागरिक सर्वाधिक असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात वृद्धांची फसवणूक, हत्या असे २१,४१० गुन्हे दाखल झाले. २०१४च्या तुलनेत हा आकडा २,६९३ने वाढला आहे. त्यापैकी ४,६९४ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत.
आकडेवारीतली धक्कादायक बाब म्हणजे ज्येष्ठांच्या सर्वाधिक हत्याही महाराष्ट्रातच घडल्या आहेत. यामध्ये १६९ वृद्धांची हत्या झाली तर ६७ वृद्धांच्या हत्येचा प्रयत्न झाला. चार वृद्ध महिलांवर बलात्कार करण्यात आला. ८०० फसवणुकीचे बळी ठरले. महाराष्ट्रातील वृद्धांच्या घरात सर्वाधिक दरोडे घालण्यात आलेले आहेत. राज्यात असे २४ दरोडे पडले आहेत. देशात ही संख्या ३९ आहे. त्यामुळे वद्धांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अशाही दु:खद घटना...
फोर्ट परिसरात राहणारे फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत चार दिवसांनंतर घरातून बाहेर काढला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेल्या पत्नी आणि मुलाकडे त्यांची भाची सांचा डिकोस्टाने संपर्क साधला.
मात्र अंत्यसंस्कारासाठीही वेळ नसल्याचे सांगून मुलाने येण्यास नकार दिला. यापूर्वी ८ आॅगस्टला लोखंडवाला परिसरात घडलेल्या घटनेने तर सर्वांनाच सुन्न केले. ओशिवरा परिसरात आशा साहानी कुटुंबीयांसोबत राहायच्या.
२० वर्षांपूर्वी मुलगा रुतुराज अमेरिकेला स्थायिक झाला. त्यानंतर पतीच्या आधारावर त्या जगत होत्या. २०१३मध्ये पतीचे निधन झाले आणि त्या एकट्या पडल्या. त्यानंतर एकदाच मुलाने आईसोबत संपर्क साधला. १६ महिन्यांनी तो घरी परतला तेव्हा बंद घरातून आईचा सांगाडा त्याच्या हाती लागला.
 

Web Title:  Old, unsafe, shocking reality in the state; 21,410 cases filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.