ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मोकळ्या जागा शेतमालाच्या आठवडा बाजारासाठी मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 
सोलापूरात विजापूर रोडवरील कृषी खात्याच्या मैदानात थेट शेतमाल विक्रीसाठी श्री संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पणन विभागाचे सहाय्यक संचालक भास्कर पाटील यांनी शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना मांडली़ राज्यात सुरू झालेल्या आठवडे बाजारामुळे ग्राहकांना निवडक, स्वच्छ आणि ताज्या भाजीपाला-फळे अल्पदरात मिळत असून दलाल हटविल्यामुळे श्ेतकºयांना ही चांगला भाव मिळत असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली़ राज्यात आठवडे बाजाराची संकल्पना लोकप्रिय ठरत असल्याचे सांगताना सध्या पुण्यात ३५, मुंबईत ४० ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आठवडे बाजार सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ जागेची अडचण मुख्यमंत्र्यांनी दूर केल्याने राज्यात मोठ्या शहरात असे बाजार सुरू करणे सुलभ होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर मनपाची आडकाठी
सोलापूर महापालिकेकडे शेतकरी आठवडे बाजारासाठी मोकळ्या जागेची मागणी केली होती़ मात्र मनपाने त्यासाठी तीन लाखांची मागणी केली़ महानगरपालिकेच्या या धोरणाबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली़ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे मोठया शहरात आणखी आठवडे बाजार सुरू करण्यास चालना मिळेल़ अपार्टमेंटच्याजवळ गृहीणींना उत्तम भाजीपाला फळे खरेदी करणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीची तारण योजना फलदायी
राज्य सरकारने १९८९ साली शेतमाल योजना सुरू केली़ दुर्भाग्याने त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरले़ विद्यमान सरकारने ही योजना शेतकºयांपर्यंत पोहोचवली़ राज्यातील ५५ बाजार समित्यांमध्ये सध्या ती राबविली जात आहे़ यापुर्वी वर्षभरात ५० हजार क्विंटलपेक्षा कमी शेतमालाची साठवणुक होत असे़ यंदा डिसेंबरअखेर १ लाख २९ हजार क्विंटल शेतीमाल साठवण्यात आला आहे़ मार्चअखेर ५ लाखांचे उद्दिष्टे पूर्ण करण्याचा मानस आहे अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ अवघ्या ६ टक्के व्याजदराने शेतकºयांच्या मालावर शासन उचल रक्कम देते़ गरजेनुसार अथवा बाजारात भाव वाढल्यास मालाची विक्री करता येते त्यामुळे शेतकºयांना चांगला दर मिळू शकतो़ कापणीनंतर दर कोसळतात़ त्यांचा लाभ व्यापारी घेतात असा आजवरचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.