शोषित सत्तेवर आल्यानंतरही शोषितांचे दु:ख संपलेले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 09:37 PM2019-05-11T21:37:33+5:302019-05-11T21:48:38+5:30

दलित, आदिवासी आज निर्भय आहेत का? शेतकरी सुखी आहे का? याचे उत्तर म्हणजे आजचे वर्तमान.

no stop sorrow of Exploited after in power | शोषित सत्तेवर आल्यानंतरही शोषितांचे दु:ख संपलेले नाही

शोषित सत्तेवर आल्यानंतरही शोषितांचे दु:ख संपलेले नाही

Next
ठळक मुद्दे'' पिढीजात '' कादंबरीचे लेखक श्रीकांत देशमुख यांचे मतदोन महिन्यात खपल्या दोन आवृत्त्या

- राजू इनामदार- 
पुणे: Exploited सत्तेवर आले तर शोषितांचे दु:ख संपेल अशी महात्मा फुले, वि. रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. स्वातंत्र्यानंतर आता इतक्या वर्षांनी प्रशासनात व काही प्रमाणात सत्तापदांवरही शोषित आले असूनही दुदेर्वाने तसे झालेले दिसत नाही. पिढीजात मधून वर्तमानाचे हेच वास्तव मांडण्याचा प्रयत्न आहे असे प्रसिद्ध लेखक श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. तब्बल ६०० पृष्ठांच्या, राज्याच्या सर्वच क्षेत्रातील वर्तमानाचा व्यापक धांडोळा घेणाऱ्या देशमुख यांच्या '' पिढीजात'' या कादंबरीचे वाचकांकडून चांगले स्वागत होत आहे. अल्पावधीतच तिची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. त्या पार्श्वभूमीवर ' लोकमत'  शी बोलताना देशमुख यांनी या कादंबरीतून वर्तमानाचे वास्तव मांडले असल्याचे स्पष्ट केले.   
देशमुख स्वत: प्रशासानात एक वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रशासकीय व्यवस्थेतील तसेच मराठी समाजातील अनिष्ट व्यवहार कांदबरीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणले आहेत. सहकार निबंधक असलेल्या नवनाथ शेळके या कादंबरीच्या नायकाच्या नजरेतून व्यवस्थेमधील हीनपणाउलगडत जातो. सरकारी व्यवस्थेत काम करताना जे दिसले ते एका शेतकरी असलेल्या अधिकाºयाच्या नजरेतून टिपले असे देशमुख म्हणाले.  
-पिढीजात लिहिण्याची प्रेरणा काय? 
मी खरा तर कवी, पण जे पहात होतो ते व्यक्त करण्यासाठी एक व्यापक पट हवा होता.  शेतकरीपणाचे दु:ख काय ते स्वत: शेतकरी असल्यामुळे भोगले होते. चळवळीत काम केल्याचा अनुभव होता. सरकारी अधिकारी झाल्यानंतर त्या दु:खाचे वेगवेगळे पदर लक्षात आले. व्यवस्थेचे आकलन, विश्लेषण करता आले. त्यानंतर पुर्वसुरींचा शोध घेण्याची आसच लागली. कादंबरीच्या माध्यमातून हवा असलेला पट मिळाला व ह्यपिढीजातह्ण आकाराला आली.
-आजचे वर्तमान काय आहे?
त्यासाठी थोडे मागे जायला हवे. महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व थोर माणसांची धारणा काय होती. शिक्षण घ्या, राज्यकर्ते व्हा, म्हणजे शोषण थांबेल असेच त्यांना वाटत होते. शिक्षणाला त्यांनी परिवर्तनाचे साधन मानले होते. आज इतक्या वर्षांनंतर जवळपास प्रत्येक क्षेत्रात बहुजन समाजातील अनेकजण आले आहेत. सरकारी सेवेत आहेत, राजकारणात आहेत. पण म्हणून शोषण संपले किंवा थांबले असे म्हणता येईल का हा कळीची मुद्दा आहे. दलित, आदिवासी आज निर्भय आहेत का? शेतकरी सुखी आहे का? याचे उत्तर म्हणजे आजचे वर्तमान. तेच कांदबरीमधून मांडले आहे.
- पिढीजात मध्ये ते आहे, मात्र त्यावरचे उत्तर नाही. असे का?
लेखक किंवा कोणताही कलावंत हा काही कार्यकर्ता नसतो. तो वास्तव मांडत असतो. एक अधिकारी, जो शेतकºयाचा मुलगा आहे तो या व्यवस्थेत शिरतो, मात्र तेथील हीन स्विकारत नाही. त्याचे शेतकरीपण तो अधिकारी झाला तरी विसरत नाही. भ्रष्ट होण्याच्या प्रत्येक प्रसंगाला तो धैयार्ने तोंड देतो,  मंत्री, आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांना तो नेटाने तोंड देतो. अधिकारी म्हणून त्याच्यावर असलेल्या जबाबदारीपासून तो तोंड लपवत नाही. माज्यासाठी हेही महत्वाचे आहे. समाजात असे अनेकजण आहेत. संख्येने कमी आहेत, पण आहेत. पिढीजातचा नायक त्यांचे प्रतिनिधित्व करतो. भ्रष्टाचार होत आहे म्हणून त्याकडे तो डोळेझाक करत नाही, कारवाई करतो, त्यामुळे येणाºया सर्व प्रसंगांना तोंड देतो. माज्यामते याचे कारण तो आपण शेतकरी आहोत, आपले आईवडिल अल्पभूधारक शेतकरी आहेत हे तो विसरत नाही. कांदबरीत व्यवस्थेवरचे उत्तर आहे, मात्र ते अशा गोष्टींमध्ये दडलले आहे.
- खात्याकडून नायकाचे निलंबन होते. हा नायकाचा पराभव नाही का?
असे म्हणता येणार नाही. ह्यपिढीजातह्णचा नायक आशावादी आहे. तो व्यवस्था त्याच्या शक्तीप्रमाणे सुधारण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचे नुकसान झाले आहे ते त्यांना परत मिळावे ही त्याची प्रामाणिक भावना आहे.  त्यासाठी झालेले निलंबन तो स्विकारतो. मातीत पहुडलेल्या त्याला देहाला अंकूर फुटत आहेत असे वाटते यात थोडा ललितरम्यपणा आहे, मात्र तो त्याचा आशावाद आहे. त्यातून काही सुचवले आहे. त्याची संवेदनशीलता माज्यासाठी महत्वाची आहे. त्यातून तो असा झाला. अनेकजण तसे असतात. त्यामुळे ते पराभूत झालेह्ण किंवा त्यांनी पराभव स्विकारला आहे असे म्हणणे योग्य नाही. 
-पिढीजात मध्ये ज्या वर्तमानाचे तुम्ही दर्शन घडवले आहे त्याकडे एक अधिकारी व लेखक म्हणून तुम्ही कसे पाहता? 
महत्मा गांधी म्हणत असत की प्रशासन यंत्रणा ही दमन यंत्रणा होता कामा नये. तिच्यात लोकसहभाग हवा. ती लोकांसाठीची व्यवस्था असायला हवी. ही यंत्रणा वर्चस्ववादी होते त्यावेळी वरवर दिसायला लोकशाही दिसत असते, मात्र वास्तव हे असते की यंत्रणा वर्चस्ववादी होऊन लोकशाहीला खात असते. मात्र व्यवस्थेतच नवनाथसारखे अनेकजण असतात. त्यामुळेच निराशावादी होण्याचे कारण नाही. आशावाद माणसाला जीवंत ठेवतो. मीही एक लेखक आणि अधिकारी म्हणूनही आशावादीच आहे.
-------------------------------- 

Web Title: no stop sorrow of Exploited after in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.