सत्ताधाऱ्यांनाच दाभोलकर- पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास नकोसा : मेघा पानसरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 11:38 AM2019-02-11T11:38:05+5:302019-02-11T11:42:41+5:30

न्याय मिळण्यास दहा वर्षांचा कालावधी लागणार असेल तर सर्वसामान्यांनी कुणावर भरोसा ठेवायचा?...

no inestigation to government about dabholkar and pansare killers : Megha Pansare | सत्ताधाऱ्यांनाच दाभोलकर- पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास नकोसा : मेघा पानसरे 

सत्ताधाऱ्यांनाच दाभोलकर- पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास नकोसा : मेघा पानसरे 

Next
ठळक मुद्देसंघर्ष सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा 

पुणे :  नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे उलटून देखील पोलीस यंत्रणेकडून योग्य तो तपास होताना दिसत नाही. यावरून सरकारचा त्यांच्यावरील दबाव लक्षात येतो. अद्यापही दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येचा तपास समाधानकारक नसून समाजात खेदजनक परिस्थिती दिसून येते. न्याय मिळण्यास दहा वर्षांचा कालावधी लागणार असेल तर सर्वसामान्यांनी कुणावर भरोसा ठेवायचा? असा सवाल उपस्थित करत मेघा पानसरे यांनी सरकारवर टीका केली. 


मुक्तांगण मित्र संस्थेच्यावतीने  कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर अविरत संघर्ष करणा-या मेघा पानसरे आणि विशेष व्यक्तिंना कायम स्वरूपी घर मिळवून देणारे अविनाश बर्वे यांना जेष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते संघर्ष सन्मान  पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह आणि वीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला. मुक्तांगणच्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, अध्यक्ष ए.पी.जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. 
 मेघा पानसरे यांनी तीव शब्दांत भावना व्यक्त करताना पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, सर्वसामान्य लोकांचा न्याययंत्रणेवर विश्वास ठेवण्याकरिता त्यांना योग्य वेळेत न्याय मिळायला हवा. शासनाचे लक्ष तपासाकडे नाही. सध्या धर्मनिरपेक्ष वातावरणाला धोका निर्माण होत आहे. विशिष्ट धर्मांध शक्तींचे प्राबल्य वाढत आहे. त्याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे. सहिष्णुतेला विरोध करणा-यांना, परंपरांना नाकारणा-यांना जीवीताचा धोका आहे. दुसरीकडे जे लोक संविधान, घटना यांच्याविरोधात आवज उठवतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस सरकार दाखवत नाही. लोकशाहीच्या तत्वांना आव्हान दिले जात आहे.  परिस्थिती कितीही वाईट असली तरी निराश व्हायचं नाही. हे मनाशी ठरवून वाटचाल करायची असे ठरवले.  
जेष्ठ रंगकर्मी आळेकर म्हणाले, आधी समाजाता वावरतांना जातीचा अंदाज घेतला जायचा आता तुम्ही कोणत्या धमार्चे आहात याचा धांडोळा घेतला जातो. तुम्हांला तुमच्या धमार्ची ओळत प्रकाषार्ने करुन दिली जाते हे खेदजनक आहे. हिंसेचे उत्तर हिंसेने देता येत नाही असे माननारे नागरीक अजून ही भारतात आहे हे आपले भाग्यच आहे.  
............................
* स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात आलेले संकट कुरवाळत न बसता आपल्या मुलाला आलेले अपंगत्वाच्या समस्येवर उत्तर  शोधत अनेक  विशेष व्यक्तिंनच्या निवासाची सोय लावण्याचे धारिष्ट दाखविणा-या अविनाश बर्वे यांच्या प्रवासाने अनेकांची मने जिंकुन घेतली.  मुलगा मतिमंद असल्याचे निदान झाले त्यावेळी एक बाप म्हणुन स्विकारले. त्या विशेष मुलांसाठी डोंबिवलीत असलेली आस्तित्व ह्या शाळेत त्याला टाकले. तेथील नियमानुसार त्याला 18 वषार्नंतर त्या शाळेत ठेवता येणार नव्हते.   जो निसर्ग दु:ख देतो तोच निसर्ग दे दु:ख पचविण्याची ताकदही देतो याची  प्रचिती कालांतराने आली.  मुलगा वयाच्या 27 व्या वर्षी निर्वतला. त्यानंतर आता या विशेष मुलांसाठी वसतीगृह सुरु करण्याच्या ध्येयाने महाराष्ट्र पिंजून काढत आहे. असल्याचे बर्वे यांनी सांगितले. 

Web Title: no inestigation to government about dabholkar and pansare killers : Megha Pansare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.