Need of Castles! Problems on Social Media | ‘कास्टलेस’ची गरज! सोशल मीडियावर पडसाद

मुंबई : मुंबईसह राज्यभरात महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत असतानाच, सोशल मीडियावरही हाच विषय दिवसभर चर्चेत राहिला. पहिल्यांदाच फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नेटीझन्सने जातीवादाविरोधात रोष व्यक्त केला. आजच्या घडीला देशाला ‘कॅशलेस’ नव्हे, तर ‘कास्टलेस’ची गरज असल्याची पोस्ट शेअर केल्या.
फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवरून नेटीझन्सने जातीयवादाचा अंत झाला पाहिजे, अशा आशयाच्या पोस्ट अपलोड केल्या. त्याचप्रमाणे, काही नेटीझन्सच्या ‘ना ब्राह्मण, ना मराठा, ना दलित जिंकले, जिंकले ते फक्त इंग्रज, २०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात यशस्वी’ या पोस्टला खूप लाइक्स मिळाल्या. ‘हातात देवही नको अन् दगडही, हवं पुस्तक’, ‘आज बुद्ध हरला’ अशा आशयाच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले.
सोशल मीडियाच्या सर्व व्यासपीठांवर ‘#इँ्रें‘ङ्म१ीँङ्मल्ल’ हा हॅशटॅग चर्चेत राहिला. याशिवाय, सोशल मीडियावर सत्ताधाºयांसह मुख्यमंत्र्यांविरोधात नेटीझन्सने प्रचंड रोष व्यक्त केला, तर अभिनेत्री रवीना टंडन हिने बुधवारी बंद काळात ‘आपले कर्तव्य बजाविणाºया वाहनचालक, कचरावाहक, वाहक आणि सार्वजनिक सेवेतील कर्मचाºयांना सॅल्यूट करते,’ असे टिष्ट्वट केले.


Web Title:  Need of Castles! Problems on Social Media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.