ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईत संघटना बांधण्यात जेवढे शिवसेनेला यश आले, तेवढे कुणाला आले नाही. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटना बांधण्यास सुद्धा कमी पडलो, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादी कॉंगेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास आम्ही कमी पडलो. मात्र, बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधील, पण रचनात्मक बांधणी नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, शिवसेनेने संघटना बांधण्यापेक्षा चांगली कामे काय केली, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी करत शिवसेनेवर निशाणा साधला. 
त्याचबरोबर घराणेशाहीच्या मुद्दावरही त्यांनी यावेळी चर्चा केली. त्या म्हणाल्या की, आमच्या घरात घराणेशाही आहे. मात्र, आम्ही लोकांमधून निवडून आलोय. घराणेशाहीमुळे तुम्ही एखाद्यावेळी निवडून याल, पण तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावे लागते.