कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 08:07 AM2018-01-14T08:07:46+5:302018-01-14T09:23:44+5:30

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय

Naxalite involve in Koregaon-Bhima violence? Suspected 7 Naxalites arrested in Kalyan | कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

googlenewsNext

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर, रमाबाईनगर, विक्रोळी आणि डोंबिवली परिसरात हे सात जण राहत होते. शुक्रवारी रात्री ते कल्याण रेल्वे स्थानकात एकत्र येणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून सातही जणांना ताब्यात घेतले. एटीएसच्या कुठल्याच प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांना देता न आल्याने संशय बळावला. त्यांच्या चौकशीत ते नक्षली संघटनेसाठी काम करत
असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे आक्षेपार्ह मजकूर असलेली कागदपत्रे तसेच बॅनर आढळून आले.

सातही जण ते ३० ते ५२ वयोगटातील आहेत. तेलंगणाच्या करीमनगर आणि नालगोंडा येथील हे रहिवासी आहेत. ते आणि त्यांचे काही सहकारी सीपीआय (माओ) या बंदी घातलेल्या संघटनेसाठी काम करत असल्याची कबुली त्यांनी एटीएसला दिली आहे. या सर्वांना बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायदा, १९६७ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Web Title: Naxalite involve in Koregaon-Bhima violence? Suspected 7 Naxalites arrested in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.