सटाण्यातील चौदा लाखांच्या दरोड्याची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:23 PM2017-11-20T15:23:32+5:302017-11-20T15:28:39+5:30

nashik,satana,daroda,four,criminal,arrested | सटाण्यातील चौदा लाखांच्या दरोड्याची उकल

सटाण्यातील चौदा लाखांच्या दरोड्याची उकल

Next
ठळक मुद्देतेलदर शिवारातील घटना ; चौघा दरोडेखोरांना अटक पती-पत्नीस मारहाण करून चौदा लाखांची लूटसटाणा व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक : सटाणा तालुक्यातील तेलदर शिवारात दरोडा टाकून दाम्पत्यास जबर मारहाण केल्यानंतर चौदा लाखांची लूट करणाºया चार दरोडेखोरांना सटाणा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून सोमवारी (दि़२० अटक केली़ सोमनाथ गुलाब पवार (३७, रा़जाखोड, सटाणा), दयाराम नामदेव पवार (४५, रा़दसाने,सटाणा) सुनील गोरख काळे (२०,गारखेडा, जि़औरंगाबाद) व आकाश लक्ष्मण चव्हाण (२३, गारखेडा, जि़औरंगाबाद) असे अटक केलेल्या चौघा दरोडेखोरांची नावे आहेत़ उर्वरीत साथीदारांचा ग्रामीण पोलीस शोध घेतल आहेत़ विशेष म्हणज दरोड्याचा कट रचणारा प्रमुख संशयित हा दसाने गावातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे़
३० आॅक्टोबर २०१७ रोजी सटाणा तालुक्यातील दसाने गावात तेलदर शिवारातील केवळ खैरनार व त्यांची पत्नी सुशिलाबाई खैरनार हे रात्रीच्या सुमारास झोपलेले असताना सात - आठ दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाजाची लोखंडी जाळीची कडी तोडून घरात प्रवेश केला़ तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडके व हत्यारांनी खैरनार दाम्पत्यास जबर मारहाण करून १२ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकून लूटून नेला होता़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती़ तसेच याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दरोड्यातील जखमी दाम्पत्याने तपासामध्ये दरोडेखोर हे अहिराणी व डांगी भाषा बोलत असल्याची माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना दिली होती़ त्यानुसार गुप्त बातमीदारांमार्फत परिसरात तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केल्यानंतर सटाणा परिसरातील संशयित सोमनाथ पवार यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने दरोड्याची कबुली दिली तसेच आपल्या साथीदारांची नावेही सांगितली़ दरोड्यातील दयाराम पवार यास साक्री, तर सुनील काळे व आकाश चव्हाण यांना सापळा रचून औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले़ संशयित सर्व सराईत असून त्यांच्याकडून सटाणा, देवळा व मालेगाव परिसरताील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़
ग्रामीण पोलीस अधीक्षक व वरीष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आश्षि आडसूळ, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, दीपक पवार, स्वप्निल नाईक, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी शिलावट, अरूण पगारे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दीपक अहिरे, अशोक जगताप, रवी वानखेडे, नामदेव खैरनार, सुनील पानसरे, पोलीस नाईक अमोल घुगे, राजू सांगळे, संदीप हांडगे, पोलीस शिपाई प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, गणेश पवार, चालक राजू वायकांडे, योगेश गुमलाडू, भूषण रानडे, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जिभाऊ पवार, मन्साराम बागूल, रविंद्र भामरे, देवराम खांडवी, पुंडलीक डंबाळे, प्रकाश श्ािंदे, पोलीस शिपाई विजय वाघ, योगेश गुंजाळ, संदीप गांगुर्डे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़


दसानेतील पवार दरोड्याचा प्रमुख सूत्रधार
पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित दयाराम पवार हा दसाने परिसरातीलच रहिवासी असून त्यास गावातील प्रगतीशील शेतकºयांची संपूर्ण माहिती होती़ त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील संशयित सुनील काळे , आकाश चव्हाण व त्यांचे साथीदारांना सटाण्याला बोलावून घेऊन खैरनार यांच्या घरावरील दरोड्याचा कट रचला होता़ तर संशयित सोमनार पवार हा एक ते दीड वर्षांपासून दयाराम पवारच्या संपर्कात असून परिसरातील सधन शेतकºयांची माहिती घेत होता़

Web Title: nashik,satana,daroda,four,criminal,arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.