नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:35 PM2018-06-28T20:35:40+5:302018-06-28T20:59:24+5:30

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७८ मते वैध ठरली़ तर बाद मतांची संख्या एक हजार ३४१ तर १०३ मतदारांनी नोटाचा वापर केला़ दरम्यान, विजयासाठी ठरविण्यात आलेल्या प्रथम पसंतीच्या मतांचा २३९९० चा कोटा पुर्ण न झाल्याने इलेमेशन राउंडला सुरूवात करण्यात आली़

nashik,mlc,election,Darade,leading | नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर

नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्दे मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावरविजयासाठीचा कोटा पुर्ण न झाल्याने इलेमेशन राउंडला सुरूवात

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर आहेत. मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७८ मते वैध ठरली़ बाद मतांची संख्या एक हजार ३४१ असून १०३ मतदारांनी नोटाचा वापर केला़ दरम्यान, विजयासाठी ठरविण्यात आलेल्या प्रथम पसंतीच्या मतांचा २३९९० चा कोटा पुर्ण न झाल्याने इलेमेशन राउंडला सुरूवात करण्यात आली़

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असलेली मते याची खातर जमा करण्यात आली. त्यासाठी २० टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर एक मतपेटी अशाप्रकारे एका फेरीत २० मतपेट्यातील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राजाराम माने, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी व अधिका-यांची नेमणूक करण्यात आली होती.

दुपारी बारा वाजेपर्यंत मतपेट्यातील मतपत्रिकेची खात्री करीत असताना, मोजलेल्या मतपत्रिका एका हौदात टाकून एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकी २५ या प्रमाणे मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात येऊन, त्यातुन वैध, अवैध व संशयित मतपत्रिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४७हजार ९७८ मते वैध ठरली. एकूण वैध मतदानाच्या निम्मे व अधिकचे एक अशा प्रकारे विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या फेरीत २३ हजार ९९० मतांचा कोटा ठरवून देण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात करण्यात आली.

या निवडणुकीच्या मतमोजणीविषयी मतदार, व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असल्याने सकाळी ११ वाजेनंतर निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मतमोजणी केद्रांतदेखील सकाळी सात वाजे पासून उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी हजर झाले होते. परंतु मतमोजणीच्या किचकट पद्धतीमुळे काही तासातच उमेदवार व प्रतिनिधींचा उत्साह कमी होत गेला. तर दुसरीकडे मतमोजणी अधिकारी व कर्मचा-यांनी मतमोजणी प्रकिया पुढे वेगाने सुरू केली.


उमेदवारांना मिळालेली प्रथम पसंतीची मते
* किशोर दराडे - शिवसेना - १६,८८६,
* संदीप बेडसे- मित्रपक्ष - १०,९७०,
* अनिकेत पाटील - भाजप - ६,३२९,
* भाऊसाहेब कचरे - अपक्ष - ५,१६७,
* शालिग्राम भिरोड - अपक्ष - ३,८७६,
* अमृतराव शिंदे - अपक्ष - ३, २०९़

 

Web Title: nashik,mlc,election,Darade,leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.