नाशिकला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:24 PM2017-11-21T16:24:29+5:302017-11-21T16:26:34+5:30

nashik,miscreants,spoiled,two,wheelers | नाशिकला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाक्या

नाशिकला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाक्या

Next
ठळक मुद्देदेवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी परिसरातील चौधरी मळ्यातील घटना दोन दुचाकी पेटवून दिल्या ; देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : देवळाली कॅम्पमधील जुनी स्टेशनवाडी परिसरातील चौधरी मळ्यातील दोन दुचाकी समाजकंटकांनी पेटवून दिल्याची घटना सोमवारी (दि़२०) रात्रीच्या सुमारास घडली़ या घटनेमध्ये दोन्ही दुचाकींची मोठे नुकसान झाले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी मळ्यात शफीक अब्दुल शेख हे कुटुंबासह राहत असून पेंन्टीगचे काम करून उदरनिर्वाह करतात़ त्यांच्यासोबतच बहीण नूरजहाँ ही पती मोहमद इद्रीस शहासोबत राहते़ शेख यांचे दाजी शहा यांनी होंडा कंपनीची नवीन युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५, ईके ५२२०) ही खरेदी केली आहे़ शहा यांना कामानिमित्त उत्तर प्रदेश येथे जावयाचे असल्याने त्यांनी आपली दुचाकी शेख यांचे शेजारी अशोक भालेराव यांच्या घरासमोर व दुचाकीशेजारी उभी केलेली होती़
सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेख यांचे मामा रहेमान सय्यद हे दुचाकी पेटलेल्या असल्याने आरडा-ओरड करीत होते़ अज्ञात समाजकंटकांनी शेख यांचे दाजी शहा यांची होंडा युनिकॉर्न (एमएच १५, ईके ५२२०) व शेजारी राहत असलेले अशोक अल्लाटे यांची होंडा शाईन (एमएच १५, एफझेड ३१८२) या दोन्ही दुचाकींना आग लावली होती़ या आगीमध्ये युनिकॉर्नचे ३५ हजार व शाईन दुचाकीचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़
या प्रकरणी अज्ञात समाजकंटकांविरूद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,miscreants,spoiled,two,wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.