...अन् जन्मठेपेच्या कैद्याची जीवनातूनही एक्झिट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:34 PM2018-01-02T23:34:26+5:302018-01-03T14:48:07+5:30

नाशिक : गुन्ह्याची शिक्षा भोगली की शिक्षेतून मुक्तता होते, असे म्हटले जाते़ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही चुकीच्या कृत्याचा पश्चात्ताप व गुन्हा करणाºयांना जरब बसावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून परावृत्त व्हावे यासाठी दिली जाते़ मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला मात्र गुन्हेगारी कृत्यामुळे न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वयोवद्ध कैद्याची मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली. मुंबईला जाण्यासाठी त्याने रेल्वेचे तिकीटही काढले मात्र रेल्वे पकडण्यापूर्वीच त्याचा रेल्वेस्थानकावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़

nashik,life,imprisonment,prisioner,death | ...अन् जन्मठेपेच्या कैद्याची जीवनातूनही एक्झिट!

...अन् जन्मठेपेच्या कैद्याची जीवनातूनही एक्झिट!

Next
ठळक मुद्देजन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर मंगळवारी तुरुंगातून सुटका

नाशिक : गुन्ह्याची शिक्षा भोगली की शिक्षेतून मुक्तता होते, असे म्हटले जाते़ न्यायालयाने दिलेली तुरुंगवासाची शिक्षा ही चुकीच्या कृत्याचा पश्चात्ताप व गुन्हा करणाºयांना जरब बसावी तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यापासून परावृत्त व्हावे यासाठी दिली जाते़ मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला मात्र गुन्हेगारी कृत्यामुळे न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वयोवद्ध कैद्याची मंगळवारी तुरुंगातून सुटका झाली. मुंबईला जाण्यासाठी त्याने रेल्वेचे तिकीटही काढले मात्र रेल्वे पकडण्यापूर्वीच त्याचा रेल्वेस्थानकावरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़

मूळचा पश्चिम बंगालमधील वलदा जिल्ह्याच्या कलिया तालुक्यातील मेहराम गावचा रहिवासी असलेला नूर जिआरोस इस्लाम यास न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती़ बंदी क्रमांक सी-९६९५असलेला नूर इस्लाम हा १० जानेवारी २०१५ पासून नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता़ नाशिकरोड कारागृहातून मंगळवारी (दि़०२) सकाळी नूर इस्लामची मुक्तता करण्यात आली होती़ यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोहोचून त्याने नाशिकरोड ते कुर्ला असे तिकीटही काढले़ दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी असलेली ही रेल्वे पकडण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.

कारागृहातून सुटलेला नूर इस्लाम हा नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील फ्लॅटफार्म क्रमांक चारवर पडलेला होता़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणीतरी आजारी इसम पडलेला असल्याची माहिती दिल्यानंतर १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता़ त्याच्याकडे कारागृहातील ओळखपत्र, मुक्तता केल्याचे पत्र तसेच रेल्वेचे तिकीटही आढळून आल्याने त्याची ओळख पटली़ जन्मठेपेतील कैदी असलेला नूर कदाचित आपल्या नातेवाइकांना वा आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता़ मात्र कारागृहातील मुक्ततेनंतर त्याने जीवनातूनही एक्झिट घेतली़

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण

जन्मठेपेची शिक्षा भोगून मुक्तता झालेला नूर इस्लाम याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे़ रेल्वेस्थानकावर काहीतरी आजाराने पडलेला इसम म्हणून रुग्णालयात आणलेल्या नूर इस्लामची कारागृहात वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, याचा उलगडा होणे गरजेचे आहे़

Web Title: nashik,life,imprisonment,prisioner,death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.