खून करणाऱ्या चौघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:40 PM2018-07-03T14:40:55+5:302018-07-03T14:47:44+5:30

नाशिक : उरुसानिमित्त ठेवलेल्या नियाजच्या (प्रसाद) भोजनावेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून तौफिक मोहम्मद हनिफ शेख (२२, रा़ खडकाळी) याचा चॉपरने वार करून खून करणाºया चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ एप्रिल २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास खडकाळीमध्ये ही घटना घडली होती़

nashik,court,murdre,Life,imprisonment | खून करणाऱ्या चौघांना जन्मठेप

खून करणाऱ्या चौघांना जन्मठेप

Next
ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालय : नियाजच्या पंक्तिमध्ये वाद २०१६ ची घटना खडकाळीमध्ये

नाशिक : उरुसानिमित्त ठेवलेल्या नियाजच्या (प्रसाद) भोजनावेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून तौफिक मोहम्मद हनिफ शेख (२२, रा़ खडकाळी) याचा चॉपरने वार करून खून करणाºया चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ एप्रिल २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास खडकाळीमध्ये ही घटना घडली होती़

१४ एप्रिल २०१६ रोजी खडकाळीत ख्वाजा गरीब नवाज उरुसानिमित्त नियाज (प्रसाद)होता़ यावेळी भोजनातील पंक्तिमध्ये सैफ मोहमंद हनिफ शेख व आरोपी हुजेर रफिक शेख (१९) यांच्यामध्ये वाद झाले़ यानंतर सैफने भद्रकाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता़ या घटनेनंतर चार दिवसांनी अर्थात १८ एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास सैफचा भाऊ तौफिक हा दुकानातून अंडी घेऊन येत असताना आरोपी हुजेर रफिक शेख, मुक्तार उर्फ राज जाकिर खान, मोहसिन जावेद खान व शहबाज मजिद पठाण (सर्व राख़डकाळी) यांनी कुरापत काढून जीन मंजिक येथे अडविले़ यानंतर मुक्तार व मोहसनि यांनी तौसिफचे हात धरले व हुजेरने हातातील चॉपरने वार करून खून केला़ तर शहबाजने वाचविण्यासाठी येणाºया नागरिकांना प्रतिबंध केला़ यानंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले़ या पकरणी सैफ शेखच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़

न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व सरकारी वकील रविंद्र निकम यांनी सतरा साक्षीदार तपासून न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर केले़ यामध्ये शवविच्छेदन करणारे डॉक्टर, प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्वाची ठरली़ न्यायाधीश गिमेकर यांनी या चौघांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला़तसेच दंडाची रक्कम मयत तौफिक शेखच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश दिले़

या गुन्ह्याचा तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गोरख जाधव व सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी केला़ दरम्यान, न्यायालयात निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़

Web Title: nashik,court,murdre,Life,imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.