काळा पैसा नरेंद्र मोदींनी स्वतः पांढरा केला, राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 05:22 PM2017-09-08T17:22:43+5:302017-09-08T21:23:30+5:30

मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.

Narendra Modi himself black money black money - Rahul Gandhi | काळा पैसा नरेंद्र मोदींनी स्वतः पांढरा केला, राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

काळा पैसा नरेंद्र मोदींनी स्वतः पांढरा केला, राहुल गांधींची मोदींवर घणाघाती टीका

Next

परभणी, दि. 8 - मराठवाड्याच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधींनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजपाच्या काळात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केली, ही शरमेची बाब आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देते, भाजपाने अशी फक्त खोटी आश्वासने दिली. काळा पैसा मोदींनी स्वतः पांढरा केला.

शेतीमालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकरी उभारी घेऊ शकत नाही. काँग्रेस सरकारने शेतक-यांना 70 हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. परंतु भाजपा सरकार फक्त 50 उद्योगपतींसाठी काम करतेय. काँग्रेस पक्षाने दबाव टाकला म्हणून भाजप सरकारने कर्जमाफी केली. ही कर्जमाफी RSS भाजपावाली कर्जमाफी आहे.

मार्केटिंग 35 हजार कोटींची केली, मात्र कर्जमाफी फक्त पाच हजार कोटींची दिली. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केली नाही, काही निवडक शेतक-यांची कर्जमाफी केल्याचाही घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. गेल्या काही तासांपूर्वीसुद्धा राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नॅनो प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीला 65 हजार कोटी दिले असा गंभीर आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. नॅनो प्रकल्पासाठी मोदी पैसे देतात, पण शेतकऱ्यांना एक रुपया पण देत नाहीत असे राहुल म्हणाले. नांदेडच्या मोंढा मैदानावर राहुल गांधींची जाहीर सभा चालू आहे. राहुल गांधी आज मराठावाडा दौ-यावर आहेत. 

मागच्या तीन वर्षात महाराष्ट्रात नऊ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असे राहुल म्हणाले. काँग्रेसच्या दबावामुळेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भाजपा सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले. काळ्या पैशाविरोधातील नरेंद्र मोदींची  मोहीम फेल ठरली आहे. देशाच्या नुकसानीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहे. 2 कोटी युवकांचा रोजगार कुठे गेला ? केवळ स्वप्न दाखवून चालणार नाही त्यांचे भविष्य दाखवा, तीन वर्षांपासून किती युवकांना रोजगार दिला ? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. 

Web Title: Narendra Modi himself black money black money - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.