उपचारांच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीवर अत्याचार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:29 AM2018-04-19T02:29:26+5:302018-04-19T02:29:26+5:30

ऊसतोड कामगाराच्या २१ वर्षीय मुलीवर उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने तब्बल सहा वर्षे अत्याचार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाने एकदा तिचा गर्भपातही करविला. याप्रकरणी भोंदूबाबासह त्याची पत्नी व मेहुण्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

In the name of treatment, crime against Bhondubaba's girl, crime in Beed rural police station | उपचारांच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीवर अत्याचार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा

उपचारांच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीवर अत्याचार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा

Next

बीड : ऊसतोड कामगाराच्या २१ वर्षीय मुलीवर उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने तब्बल सहा वर्षे अत्याचार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाने एकदा तिचा गर्भपातही करविला. याप्रकरणी भोंदूबाबासह त्याची पत्नी व मेहुण्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पीडिता केज तालुक्यातील रहिवाशी आहे. तिचे आई - वडील उसतोड कामगार आहेत. २०१२ साली पीडितेला चक्कर येत होती. त्यामुळे तिला दासखेड येथील बाजी बाबाकडे नेण्यात आले. तेथे त्यांची विजय साधुजीराव वीर (२५) या भोंदूबाबासोबत ओळख झाली. वीर याने तिला आपल्या घरी ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तो पीडितेला कर्झणी या मूळ गावी घेऊन गेला. ठिकठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. २०१३ साली ती तीन ते चार महिन्यांची गर्भवती राहिली. त्या वेळी विजयने तिचा गर्भपातही करविला. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्यावर अत्याचार करीत असे, तसेच वाच्यता केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असे. संशय येऊ नये म्हणून तिला पुरुषांचा पेहराव करून फिरवित असे. एकदा तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याचेही पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी रात्री सुमारास पीडितेने वीर याच्या मोबाइलवरून आपल्या आई - वडिलांशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तिची सुटका केली.

भोंदूच्या पत्नीला अटक
याप्रकरणी विजय वीर, मंदा वीर व बनसोडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून मंदा हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: In the name of treatment, crime against Bhondubaba's girl, crime in Beed rural police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.