माझी कृषी योजना : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:23 PM2018-12-14T13:23:40+5:302018-12-14T13:23:55+5:30

गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, राज्य शासनातर्फे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आणलेली आहे.

My Agriculture Scheme : Ideal Village Resolutions and Projects | माझी कृषी योजना : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प

माझी कृषी योजना : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प

Next

गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, राज्य शासनातर्फे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून गावांचा विकास, यात शासनाचा सहभाग, सत्तेचे विकेंद्रीकरण यासह सप्तसूत्री ज्यात नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी आणि श्रमदान, लोटाबंदी व बोअरवेलबंदी ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

या योजनेत निकषात बसणाऱ्या गावांची निवड करण्यात येते. योजनेची अंमलबजावणी किंवा संनियंत्रणासाठी विविध स्तरांवर  समित्यांची रचना करून प्रकल्प आराखड्यानुसार सर्व कामे प्रकल्प कार्यन्वयन संस्थांच्या माध्यमातून केले जाते. या योजनेत गाव निवडताना, गावाच्या एकूण क्षेत्रापैकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त सिंचन नसावे. लोकसंख्या १० हजारांपेक्षा जास्त नसावी. महसुली क्षेत्र २ हजार ५०० हेक्टरपर्यंत असावे. ग्रामविकास निधी उभारून तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी आवश्यक. ग्रामस्थांनी सप्तसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावांनी ग्रामसभेत प्रस्ताव पास करून तो पाठवावा लागतो. जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने प्रस्तावाची पुढील कार्यवाही होते.

Web Title: My Agriculture Scheme : Ideal Village Resolutions and Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.