माझी कृषी योजना : केळीवरील बुरशी रोग नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:25 PM2018-11-29T12:25:28+5:302018-11-29T12:27:29+5:30

ही योजना धुळे, नंदुबार, जळगाव आदी  जिल्ह्यांसाठीच आहे.

My Agriculture Scheme : Control of Fungus Disease in the Banana | माझी कृषी योजना : केळीवरील बुरशी रोग नियंत्रण

माझी कृषी योजना : केळीवरील बुरशी रोग नियंत्रण

Next

केळी पिकावर पडणारा सिगाटोका हा बुरशी प्रकारातील रोग आहे. हा रोग एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीमुळे होतो. अतिशय दमट हवामानामध्ये रोगट पानांवरील दवबिंदूंमध्ये बीजाणू मिसळल्यानंतर हे दवबिंदू निरोगी पानांवर पडल्यानंतर हा रोग इतर पानांवर पसरतो.

उष्ण व दमट हवामान, सतत पडणारा रिमझिम पाऊस, दीर्घकाळ  ढगाळ वातावरण, २३ ते २५ डिग्री तापमान या गोष्टी रोगासाठी अनुकूल आहेत. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. महाराष्ट्रात मुख्यत: पिवळा सिगाटोका हा रोग आढळतो. हा करपा रोग जर केळी पिकावर पडत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुकास्तरावर अनुदानित रकमेत कीटकनाशके आणि बुरशीनाशके मिळण्याची योजना शासनाने सुरू केलेली आहे.

ही योजना धुळे, नंदुबार, जळगाव आदी  जिल्ह्यांसाठीच आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:ची शेतजमीन असावी लागते. शेतीत केळीचे पीक असावे लागते. ७/१२ उतारा नमुना ८ अ ही कागदपत्रे लागतात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार  जिल्हानिहाय जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. याद्वारे रोगाच्या नियंत्रणावर मार्गदर्शन केले जाते.

Web Title: My Agriculture Scheme : Control of Fungus Disease in the Banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.