ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - वर्सोवा परिसरातील नामांकित शाळेतील महिला कर्मचा-याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नेहा बालसिंग राजपूत ( वय 25 वर्ष ) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. वर्सोव्यातील एमटीएनएल जंक्शनवर तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटल येथे पाठवला आहे. 
 
सोमवारी ( 17 जुलै ) सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या नेहाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेहा अंधेरीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होती. वर्सोवातील एका नामंकित शाळेत ती कामाला होती. सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वर्सोवातील एमटीएनएल जंक्शनवर ती रक्ताच्या थारोळ्यात आढळली. 
 
घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनं तीन वेळा वार करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 
 
याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. नेहाचा पती स्कूल बसचालक आहे. गेल्या चार महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. प्राथमिक तपासात नेहाच्या पतीनंच तिची हत्या केल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. 
आणखी बातम्या वाचा