मुंबई-नांदेड अवघ्या ४५ मिनिटांत, चार वर्षांनंतर सेवेत; कलाकारांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:40 AM2017-11-17T02:40:28+5:302017-11-17T02:40:45+5:30

मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे.

 Mumbai-Nanded only in 45 minutes, serving four years later; Artists' Journey | मुंबई-नांदेड अवघ्या ४५ मिनिटांत, चार वर्षांनंतर सेवेत; कलाकारांचा प्रवास

मुंबई-नांदेड अवघ्या ४५ मिनिटांत, चार वर्षांनंतर सेवेत; कलाकारांचा प्रवास

googlenewsNext

मुंबई : मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबई-नांदेड-मुंबई ही विमानसेवा खासगी विमान कंपनीकडून देण्यात येत आहे.
देशांतर्गत विमान सेवेला चालना मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजना हाती घेतली. मुंबई-नांदेड पहिल्या विमान सेवेतून अभिनेत्यांसह चित्रपट दिग्दर्शकांनी लाभ घेतला. यात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन, अभिनेता शक्ती कपूर, अभिनेता आदित्य पांचोली यांचा समावेश आहे.
उडान योजनेतर्गंत मुंबई-शिर्डी आणि शिर्डी-हैद्रराबाद हवाई मार्गावर विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबई-नांदेड विमान प्रवासासाठी अडीच हजार ते तीन हजार रुपयांदरम्यान आहे. या सेवेमुळे सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे़
विमानांंचे वेळापत्रक-
मुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़ नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटास पोहोचेल़ रनवेच्या दुरूस्तीसाठी बंद असलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू झाली. हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे.
नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवा तब्बल चार वर्षांनंतर पूर्ववत झाली़

Web Title:  Mumbai-Nanded only in 45 minutes, serving four years later; Artists' Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.