मुँह में राम बगल में छुरी; भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 06:04 PM2018-07-17T18:04:03+5:302018-07-17T18:10:45+5:30

गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही तुमचे सुरु आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला.

muh mein ram bagal mein churi; bhujbal attackson BJP | मुँह में राम बगल में छुरी; भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

मुँह में राम बगल में छुरी; भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

नागपूर : गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही तुमचे सुरु आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला. नागपूर येथील आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेक पार्टीचे अनेक नेते उपस्थित होते. 

मनुवाद कायदा हीन होता म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. मात्र, आता पुन्हा मनुवादी कार्यक्रम सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, अंधाराने भरलेली मनुस्मृती नको पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, मनूने 97 टक्के लोकांना हीन वागणूक दिली, तरीसुद्धा त्याला भिडे गुरुजी श्रेष्ठ म्हणतात. हे काय सुरु आहे, असा सवालही त्यांनी केला.

एकीकडे, सत्ताधारी सरकारविरोधात बोलणा-यांना गोळ्या घातल्या जात आहेत. गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही, असे सांगत छगन भुजबळ यांनी भाजपावर हल्लाबोल चढवला. याचबरोबर, शाळांमध्ये शालेय पुस्तकांच्या ऐवजी धार्मिक पुस्तके वाटली जात आहेत,असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 

दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी सुद्धा भाजपावर टीका केली. भिडे गुरुजी म्हणतात संतांपेक्षा मनु श्रेष्ट आहे, हे धाडस कसे होते, त्यांच्या  मागचा मास्टर माईंड कोण आहे? कुठल्या दिशेने कारभार सुरु आहे, असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला. 

Web Title: muh mein ram bagal mein churi; bhujbal attackson BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.