मुंबई-वडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाला मनसेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:18 PM2018-04-16T15:18:58+5:302018-04-16T15:18:58+5:30

मनसेचं प्रांत कार्यालय बाहेर निदर्शन; प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

MNS opposes the Mumbai-Vadodara expressway national highway | मुंबई-वडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाला मनसेचा विरोध

मुंबई-वडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाला मनसेचा विरोध

Next

डहाणू/बोर्डी -मुंबई वडोदरा द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाकरिता डहाणू आणि तलासरी तालुक्यातील 3,809 शेतकऱ्यांच्या  जमिनी अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. या मध्ये 32, 431 वनझाडे, 42,551 फळझाडे तोडली जाणार आहेत. पीडित शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. त्यांना शासनाकडून पैशाचे आमिष दाखवले आहे. तरी शासनाने हुकूमशाही चालवली असल्याचा आरोप मनसेने केला असून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी 16 एप्रिलला मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डहाणू उपविभागीय कार्यालयात जाऊन निदर्शने करण्यात आली. या बाबतचे पक्षाचा विरोध दर्शविणारे निवेदन प्रांत अधिकारी आंचल गोयल यांना देण्यात आले.

Web Title: MNS opposes the Mumbai-Vadodara expressway national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.