MLA threatens to kill Shikhana | आमदार शेखना जीवे मारण्याची धमकी

- विशेष प्रतिनिधी
मुंबई - मालेगावचे काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना जीवे मारण्याची धमकी आल्याच्या प्रकरणी विरोधकांनी आज विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. शेख यांनी पुराव्यांसह तक्रार करूनही आरोपींना अटक होत नसल्याने वैचारिक दहशतवादाला सरकारचे पाठबळ असल्याचे सिद्ध होते असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
फेसबूक, युट्यूबवर शेख यांना धमकी देण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. विखे पाटील म्हणाले की, सनातन सारख्या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळेच वैचारिक कट्टरवाद्यांची हिंमत वाढली असून, आमदारांनाही धमक्या दिल्या जात आहेत. माझ्याविरूद्ध गोव्याच्या फोंडा न्यायालयात १० कोटी रूपयांचा दावा ठोकण्यात आला आहे. मी सनातनविरोधात बोलू नये म्हणून मला धमकावण्याचा प्रयत्न झालेला आहे, असेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. सनातनवर बंदी घालण्याच्या मागणीकडे दुर्लक्षच आहे, असा आरोप त्यांनी केला.

‘सनातन’चे स्पष्टीकरण
विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी पुन्हा एकदा सनातन संस्थेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मालेगावचे काँग्रेसी आमदार आसिफ शेख यांनी सनातनने मला धमकी दिली असा बिनबुडाचा आरोप केला. सनातन संस्था आणि हिंदू विधिज्ञ परिषद यांनी मालेगाव महापालिकेतील एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे़ लवकरच भ्रष्टाचाºयांचा चेहरा जनतेसमोर आणेल, असे सनातन संस्थेने म्हटले आहे.


Web Title: MLA threatens to kill Shikhana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.