आमदारांनी थकविलेले तीन कोटींचे भाडे माफ; चार कोटींचे निवासी भाडे एक कोटींवर

By यदू जोशी | Published: October 11, 2018 01:02 AM2018-10-11T01:02:40+5:302018-10-11T01:04:27+5:30

येथील मनोरा, आकाशवाणी या आमदार निवासांमध्ये राहणाऱ्या ९४ आमदारांनी थकविलेले चार कोटी रुपयांचे भाडे एक कोटी रुपयांवर आणून विधिमंडळ सचिवालयाने या आमदारांवर कृपाच केली आहे.

MLA are exhausted for the three crores fare; Residential rent of four crore rupees is one crore | आमदारांनी थकविलेले तीन कोटींचे भाडे माफ; चार कोटींचे निवासी भाडे एक कोटींवर

आमदारांनी थकविलेले तीन कोटींचे भाडे माफ; चार कोटींचे निवासी भाडे एक कोटींवर

मुंबई : येथील मनोरा, आकाशवाणी या आमदार निवासांमध्ये राहणाऱ्या ९४ आमदारांनी थकविलेले चार कोटी रुपयांचे भाडे एक कोटी रुपयांवर आणून विधिमंडळ सचिवालयाने या आमदारांवर कृपाच केली आहे.
३०० किमीपेक्षा जास्त अंतरावर मतदारसंघ असलेल्या आमदारांना एक अतिरिक्त खोली देण्याचा नियम आहे. पण त्यापेक्षा कमी अंतरावरील आमदारांनीही अतिरिक्त खोल्या बळकावल्याची बाब समोर आली आहे. या अतिरिक्त खोलीसाठी दरदिवशी दोन हजार रुपये याप्रमाणे भाडे आकारले जात होते. मात्र एकाही आमदाराने ते भरले नाही. हे लक्षात आल्यानंतर आमदारांना वसुलीसाठी नोटिसा पाठविण्यात आल्या. तेव्हा सर्वपक्षीय आमदारांनी विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्यावर दबाव आणत दरदिवशीचे भाडे ५०० रुपये करवून घेतले. दररोज दोन हजार रुपये भाडे गृहित धरले तर ८५ आमदारांकडे ४ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी आहे. मात्र, आता ५०० रुपयांच्या हिशेबाने एक कोटी ५ लाख रुपयांची थकबाकी काढण्यात आली आहे. या वृत्ताला सार्वजनिक बांधकाम विभागाने दुजोरा दिला. कळसेंशी संपर्क साधला असता अनेक निर्णय घेतले जातात. याबाबत तपासून सांगतो, असे ते म्हणाले.

निवडणुकीपूर्वी अदा
निवडणुकीपूर्वी भाड्याबाबत एनओसीसाठी आमदार थकबाकी अदा करतात असाही अनुभव आहे. एका विधान परिषद सदस्याने साडेअकरा लाख रुपये एकरकमी भरले. सध्या ते राज्यमंत्री आहेत.

Web Title: MLA are exhausted for the three crores fare; Residential rent of four crore rupees is one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.