अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 04:46 AM2018-04-24T04:46:46+5:302018-04-24T04:46:46+5:30

युवकाला अटक; अंघोळ करतानाचे चित्रीकरण

Minor girl raped | अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next

आखाडा बाळापूर, (जि. हिंगोली) : अल्पवयीन मुलीची आंघोळ करतानाची तयार केलेली चित्रफीत परत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना आखाडा बाळापूर येथे रविवारी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी कृष्णा भिकाजी भवर (१९) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा भिकाजी भवर याच्या घरी एक भाडेकरू राहत होते. भाडेकरुकडे नातेवाईक अल्पवयीन मुलगी राहण्यासाठी आली होती.
ती अंघोळ करीत असताना कृष्णाने चोरून तिचा व्हिडीओ तयार केला होता. त्याची चित्रफीत परत देतो म्हणून २२ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्याने तिला घरी बोलाविले आणि तिच्यावर बलात्कार केला.

धाडस दाखविल्याने गुन्हा
सदर प्रकरणातील तक्रारदार मुलगी प्रथम अधार्पूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेली; परंतु घटनास्थळाचे कारण सांगत तक्रार नोंदवली नसल्याने तिने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले. तिथे आपबिती सांगितल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून नांदेड पोलिसांच्या गाडीने तिला बाळापूर ठाण्यात सोडण्यात आले. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
 

Web Title: Minor girl raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.