नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 07:12 PM2017-11-24T19:12:43+5:302017-11-24T19:13:55+5:30

नाशिक : प्रॉपर्टीच्या वादातून सासूवर हात उगारलेल्या जावयाच्या डोक्यात संतप्त शालकाने फावड्याच्या दांडका मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली़

Mate's murder by the girl from property dispute in Nashik | नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून

नाशिकमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून शालकाकडून मेव्हण्याचा खून

Next
ठळक मुद्देपाथर्डी फाट्यावरील घटना: दांडक्याने मारहाणइंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा

नाशिक : प्रॉपर्टीच्या वादातून सासूवर हात उगारलेल्या जावयाच्या डोक्यात संतप्त शालकाने फावड्याच्या दांडका मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ २४) दुपारच्या सुमारास पाथर्डी परिसरात घडली़ शशिकांत बाळू खुर्दळ (रा. खतवड, ता़ दिंडोरी) असे मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सासू व मारहाण करणाºया शालकास ताब्यात घेतले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाट्यावरील विक्रीकर भवनजवळ असलेल्या तुळशीराम रो-हाउसमध्ये सुनंदा आनंदा मगर ही मुलगा सुनीलसोबत राहते़ शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुनंदाबाईच्या मुलीचा नवरा अर्थात जावई शशिकांत बाळू खुर्दळ हा सासुरवाडीला आला होता़ घरामध्ये आल्यानंतर काही वेळातच सासू सुनंदा व जावई शशिकांत यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या विषयावरून वाद सुरू झाला़ सुमारे दोन सुरू असलेला हा वाद इतका टोकाला गेला की जावई शशिकांत याने सासू सुनंदा हिच्यावर हात उचलला़ या ठिकाणी उपस्थित असलेला सुनंदा यांचा मुलगा व मयत खुर्दळ यांचा शालक सुनील याचा राग अनावर झाला व त्याने घरातील फावड्याचा दांडा उलचून दाजी शशिकांतच्या डोक्यात मारला़
सुनीलने डोक्यात मारलेला दांडक्याचा आघात इतका जबर होता की, मेव्हणा शशिकांतचा जागीच मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ या ठिकाणी पडलेल्या शशिकांत यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाल हलविण्यात आला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सासू सुनंदा मगर व शालक सुनील मगर या दोघांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़

Web Title: Mate's murder by the girl from property dispute in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.